Saturday, 6 August 2022

 भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी.

- डॉ. नीलम गोऱ्हे.

            नागपूर, दि. 5 : भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला.

            तत्पूर्वी डॉ. गोऱ्हे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांना प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला, त्यांना न्याय मिळण्याकरीता कायदेशीर मदत करणार असल्याची ग्वाही देखील दिली.

            नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पीडित महिलेच्या प्रकृतीची विचारणा केली. तिच्या संपूर्ण उपचारासाठी शासकीय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली. या दरम्यान भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक (का.) अनिकेत भारती यांनीही या घटनेचा अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती दिली.

            या घटनेबाबत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. नीलम गो-हे यांनी या घटनेच्या सर्व संबंधित आरोपीस लवकरात लवकर जेरबंद करावे, घटनेचा तपास जलदगतीने करावा, घटनेतील आरोपीस मदत करणाऱ्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व कडक कलमे लावण्यात यावीत, पीडित महिलेचे समुपदेशन करावे तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोर्जे यांना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे दिल्या.

०००



 



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi