Saturday, 2 July 2022

Dilkulas

 दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. लालमियाँ शरीफ शेख यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शरीफ शेख यांच्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग शनिवार दि. 2 जुलै रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कार्यरत असून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहे. या मंडळाचे उद्दीष्ट, कार्य आणि भविष्यातील योजना याविषयी सविस्तर माहिती डॉ. लालमियाँ शरीफ शेख यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

0

दिलखुलास’ कार्यक्रमात अपर परिवहन आयुक्त

जितेंद्र पाटील यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 4 जुलै व मंगळवार 5 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ मुलाखतकार सुप्रिया कुऱ्हाडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            राज्यात आता पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसात जशी आरोग्याची काळजी घ्यावी लागते तशी आपल्या वाहनांचीही काळजी घ्यावी लागते. प्रवासात पावसामुळे येणाऱ्या अडचणींनाही सामोरे जावे लागते. वाहनांची काळजी, प्रवास आणि नागरिकांची कर्तव्ये आणि अधिकार या सर्वांविषयी सविस्तर माहिती जितेंद्र पाटील यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


0000


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi