महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार.
राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार- ललित गांधी
……………………………………………………………
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन 2018 चा राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड केली त्या राजस्थानच्या श्रीमती रूमादेवी ज्यांनी अल्पशिक्षित व ग्रामीण भागातील असुनही भारतीय कलाकुसर जोपासताना 30 हजारहुन अधिक महिलांना रोजगार दिला, हार्वर्ड विद्यापिठाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन गौरव केला, अशा असामान्य कर्तृत्वान महिलेच्या ज्ञानाचा व कौशल्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांना व्हावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर व श्रीमती रूमादेवी यांच्या दरम्यान महत्वपुर्ण सामंजस्य करार चेंबरच्या मुंबई येथील मुख्यालयात संपन्न झाला.
महाराष्ट्रातल्या सर्वच महिलांना त्यांच्या उदार निर्वाह साठी नवीन साधन उपलब्ध होईल, त्यांच्याकडे असलेल्या कलाकुसरीला वाव मिळेल आणि त्यांना नवीन प्रकारच्या कलाकृती शिकण्याचे प्रशिक्षण मिळेल व या माध्यमातून त्या स्वावलंबी होऊ शकतील या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ने रुमादेवी फाउंडेशन सोबत हा महत्त्वपूर्ण करार केलेला आहे अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील महिला कारागिरांच्या उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनासाठी व्यापक बाजारपेठ मिळविण्याकरिता संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर व रुमा देवी फाउंडेशन प्रयत्नशील राहील असे श्रीमती रुमा देवी यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील महिलांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण हे महाराष्ट्र चेंबर व रुमादेवी फाउंडेशन तर्फे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजकांकरिता उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, राज्य व केंद्र सरकारच्या योजना याविषयी माहिती देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल असे महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी सांगितले.
श्रीमती रूमादेवी यांचा महाराष्ट्र चेंबर तर्फे ललित गांधी यांनी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, रुमादेवी फाउंडेशनचे विक्रम सिंग, युवा समितीचे चेअरमन संदीप भंडारी, पब्लिक रिलेशन व कॉर्पोरेट कम्युनिकेशन समितीचे चेअरमन आशिष गदरे, महिला समितीच्या को चेअरपर्सन कविता देशमुख, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment