Saturday, 30 July 2022

 लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित

          मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या जुलै-2022 या महिन्याच्या अंकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी समारंभ, कृषी विभागाच्या विविध योजना, महिला शेतक-यांच्या यशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

            राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले आहे. या अंकामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांचा परिचय, कृषी विभागाच्या विविध योजना, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील महाराष्ट्राची कामगिरी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, शेळीपालन, वनहक्क कायदा, राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या महिला लाभार्थींच्या यशकथांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


०००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi