Friday, 1 July 2022

मदरसा योजना

 मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि.1 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आणि "धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" सन 2022-23 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

            शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांसाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2022-23 राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील "धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" सन 2022-23 राबविण्यात येत आहे. यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी 31 जुलै 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ते शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2022 राहील याची संबंधितांनी नोंद घेण्यात यावी, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

००००



 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi