*घरगुती 20 उपाय*
1) हाडे मजबूत व ताकदवान होण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी 1 चमचा तीळ खावी
2) नेहमी अपचन व सतत तोंडाची दुर्गंधी येत असल्यास सकाळ व सायंकाळ आंब्याचे एक पान 10 दिवस सकाळी खावे
3) मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्यांना दररोज 15 दिवस एक पेरू खाण्यास द्यावा.
4) नियमित एक ग्लास ताक दररोज पिण्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता फार कमी असते
5) पॅरालिसिस होऊ नये म्हणून पाय उत्तर दिशे कडून झोपावे
6) जुलाब थांबण्यास 5-6 मेथी दाणे कोमट पाण्यात टाकून दिवसातून 3 वेळा घ्यावे
7) नेहमी तोंडात पाणी घेऊन आंघोळ केल्यास सर्दी, खोकला व ताप येत नाही
8) चेहऱ्यावरची काळपट पणा दूर करण्यासाठी 6 मोठे चमचा दुधात अर्धा चमचा लिंबू रस टाकून चांगले चोळावे व अर्धा तासाने चेहऱ्यावर किंचित पाणी मारून कापसाच्या बोळ्याने चेहरा दाब देऊन पुसावा
9) मुळव्याध दुखणे थोडे कमी होण्यासाठी अर्धा लिंबू वर 2 लहान चमचे सैंधव मीठ टाकून चोखावे दिवसातून 3 वेळा
10) पोटावरील अतिरिक्त चरबी नष्ट करण्यासाठी दररोज सकाळी सीताफळ ची 4 पाने खावीत व त्या नंतर 4 की मी फिरण्यास जावे
11) कमी ऐकू येत असेल तर एक लहान चमचा कांदा रसात 4 थेंब मध टाकून एकत्र करावे व मध व कांदा रस मिश्रण सुती कपड्यात टाकून गळून घ्या व
एक मोठ्या चमच्यामध्ये पाणी गरम करून त्यात मिश्रण टाका व कानात 3-4 थेंब रात्री झोपतांना टाकून कापसाच्या बोळाने कान बंद करा. असे 7, 14 किंवा 21 दिवस सतत करा
12) झोप येत नसल्यास लिंबाच्या रसात चंदन किंवा सुंठ उगळावी व त्यात 2 कापूर वड्या चुरून टाकाव्यात व तयार लेप रात्री झोपतांना कपाळावर लावावा
13) तात्पुरती दाढदुखी बंद होण्यासाठी हिंग व कापूर दाढेवर दाबून ठेवावा किंवा लवंग थोडी ठेऊन दुखऱ्या दाढेवर ठेऊन दाबा
14) लहान जखम झाल्यास त्यावर हळद टाकून दाबावे व जर गांजलेले लागल्यास धनुर्वात रोधक इंजेक्शन घ्यावे
15) उंदीर चावल्यास अर्धा लहान चमचा मुळ्याच्या रसात वास येणारे खोबरे तुकड्यांचा उगाळून केलेला अर्धा चमचा रस टाकावा व तयार लेप उंदीर चावलेल्या ठिकाणी दर 3 तासांनी 2 दिवस लावावा (ओले खउट खोबरे मिळाल्यास उत्तम-मंदिरात हमखास मिळते)
16) विंचू चावल्यास - ज्या ठिकाणी विंचू चावल्यास त्याच्या वरील भागात घट्ट बांधावे. मानेवर किंवा गळ्यावर चावल्यास बांधू नये. चिंचोका दगडावर/फरशीवर घासावा व दंश झालेल्या जागी त्याचे चटके द्यावे. म्हणजे चिंचोका घासावा व लावावा - असे 15-20 वेळा करावे किंवा तुरटी गरम करून विताळायला लागताच दंशाच्या ठिकाणी लावावी म्हणजे विष शोधून तुरटी खाली पडते. आंब्याच्या सिझन मधील देठातून येणारा चीक लावा.
17) ग्रामीण भागात पूर्वी असा चीक शेतकरी बाटलीत जमा करून ठेवत होते. एक बाटली घरी व एक शेतात ठेवत होते
18) घसा बसला असल्यास कोमट पाण्यात हळद टाकून घशात गळ-गळ करा
19) कुत्रा चावल्यावर कोणताही तांत्रिक उपाय किंवा घरगुती उपाय करू नका. इंजेक्शन घेणे आवश्यक असते ह्यावर आयुर्वेदिक उपाय नाहीत
20) अंमली पदार्थ जास्त सेवन केल्यास व्यक्तीची शुद्ध हरपते अश्यावेळी लिंबाचा रस 1 मोठा चमचा पाजावा 2 तासात शुद्ध न आल्यास दवाखान्यात न्यावे. दारू जास्त पिणे झाल्यामुळे जास्त बोलणे, वेडेवाकडे चालणे असल्यास 1 ग्लास आंबट ताक किंवा अर्धा ग्लास दही खावे.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.*
*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक*
*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*
(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)
No comments:
Post a Comment