*रोज सकाळी उपाशीपोटी तुप खाल्ल्याने होतात हे खास फायदे...*
*आपण निरोगी राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. निरोगी राहायचे असेल तर सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा इतर हेल्दी ड्रिंक्स प्यावे असे अनेक लोक सल्ला देतात. हे चांगलेही असते. यासोबतच आपण उपाशीपोटी देशी गाईचे तुपही खाऊ शकतो. अनेक लोकांना सकाळी-सकाळी हेवी पदार्थ खायला आवडत नाही. आणि तुप हे हेवी असते. परंतु एका संशोधनात सिध्द झाले आहे की, उपाशीपोटी तुप खाल्ल्याने फायदे होतात. आज आपण या फायद्यांविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत.*
*1. प्रत्येक पेश्या मजबूत होतात*
*आयुर्वेदानुसार तुप शरीरातील प्रत्येक पेशीला मजबूत करते. तुप आपण उपाशीपोटी खाल्ले तर हे शरीराच्या कोशिकांचे पालनपोषण करण्यात मदत करते. आपले संपुर्ण आरोग्य नियंत्रित करते.*
*2. त्वचा उजळ करते*
*तुपाचे सेवन केल्याने आपल्या कोशिका पुनर्जीवित होतात. यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिक ग्लो येतो. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. स्किन ड्राय होत नाही.*
*3. संधीवातापासून आराम*
*तुपाचे सेवन केल्याने जॉइंटपेन आणि संधीवाताची समस्या होत नाही. तुप एक नॅचरल लुब्रीकेंटप्रमाणे काम करते. तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात. हे ऑस्टियो- पोरोसिस होण्याची शक्यता कमी करते आणि हाडांना निरोगी ठेवते.*
*4. मेंदूला अॅक्टिव्ह ठेवते*
*तुम्ही सकाळी उपाशीपोटी तुप घेतले तर मेंदूच्या कोशिका अॅक्टिव्ह होतात. यामुळे नर्व्स प्रेरित होतात यामुळे मेमरी आणि शिकण्याची क्षमता वाढते. याचे सेवन केल्याने अल्जायमर सारखे आजार होण्याची शक्यता कमी असते.*
*5. वजन कमी होते*
*अनेक लोकांना वाटत असते की, तुपाचे सेवन केल्याने वजन वाढते. परंतू उपाशीपोटी 5-10 एमएल तुपाचे सेवन केल्याने तुमचे मेटाबॉलिजम रेट वाढते आणि वजन कमी होते.*
*6. केस गळती थांबते*
*उपाशीपोटी सर्वात पहिले तुपाचे सेवन केल्याने केस हेल्दी राहतात. कारण केसांना पुर्ण न्यूट्रीएंट्स मिळतात. यामुळे केस मुलायम, चमकदार राहतात.*
*7. कँसरपासून बचाव*
*तुपामध्ये अँटी-कँसर गुण असतात. यामुळे शरीरात कँसर सेल्स तयार होत नाही. यामुळे कँसर टाळता येतो.*
---------------------------------------------------------
No comments:
Post a Comment