Thursday, 2 June 2022

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ.राजाराम दिघे यांची मुलाखत

            मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरुवार, दि. 2 जून २०२२ रोजी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

            घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. राज्य शासन प्रत्येक कुटुंबाला आपल्या हक्काचं आणि मालकीचं घर मिळावं यासाठी प्रयत्नशील आहे. विशेषतः ग्रामीण भागात घरांची निर्मिती व्हावी, सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावे यासाठी राज्य शासनाने महा आवास अभियान-ग्रामीणची सुरूवात केली असून त्याद्वारे लाखो गरीब, गरजू, भूमिहीन व बेघरांचे घरकुलाचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत सविस्तर माहिती डॉ.राजाराम दिघे यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi