Saturday, 4 June 2022

 मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती

            मुंबई, दि. 4 : मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दादर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन मराठी भाषा, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. सीमा प्रश्न तसेच मराठी माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ गेल्या 72 वर्षांपासून काम करत आहे. शासन अशा संस्थाच्या पाठिशी उभे असून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल. मराठी वृत्तपत्र लेखक संघासाठी येत्या काही दिवसांत दादर परिसरात महापालिकेची जागा देण्यात येईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

            दरम्यान, शासनाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही कायदे केले. त्यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, मराठी पाट्यांची सक्ती केली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वृत्तपत्र लेखक संघाने पुढाकार घ्यावा, असे श्री. देसाई म्हणाले.


000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi