Sunday, 8 May 2022

 *वृधदाश्रम

बँक ऑफ इंडियामधील माझा मित्र श्री. भरत भोगटे याच्या वैयक्तिक जीवनात खूप संकटे कोसळली. एकुलती एक मुल गी वारली. नंतर त्याची पत्नी कॅन्सरने गेली. स्वतःच्या आयुष्यात कित्येक दु:खे भोगलेला हा भरत भोगटेने आपले एकाकीपण विसरून इतरांचे जीवन सुखी करण्यासाठी झटतो आहे. पत्नीची आणि स्वतःच्या निवृत्तीनंतरची मिळालेली सर्व पुंजी खर्चून त्यांनी समाजातील वृद्धांना सन्मानाने आणि संपन्नतेने जगण्यासाठी एक अत्यंत वेगळी संकल्पना अंमलात आणली.

*सेवानिवृत्त झाल्यावर अनेकांना मुंबईत किंवा शहरात राहण्याचा कंटाळा येतो. थोडा बदल हवा असतो. पर्यटनाला गेलो तर ते महागडे, धावपळीचे, फारसे स्वातंत्र्य नसलेले असे वाटते. बदल, निवांतपणा तर हवा असतो. नाश्ता, जेवण आणि दैनंदिन गोष्टी करायचा कंटाळा येतो किंवा झेपत नाहीत. पुढच्या पिढीला तुमच्यावर प्रेम असूनही त्यांना तुमच्यासाठी वेळ देता येत नाही. तुम्हालाही स्वतंत्रपणे, जोडीदाराबरोबर, मित्रांबरोबर ४ / ८ दिवस कुठेतरी जाऊन रहावेसे वाटते. टिपिकल हॉटेल वास्तव्य महाग आणि चाकोरीबद्ध वाटते.*   

                           *सिंधुदुर्गामधील तिरवडे गावामध्ये भरतने ' माझे आजोळ ' हा एक रिसॉर्ट बांधला असून येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राजेशाही निवृत्त जीवनाची सोय केली आहे. याची अनोखी ओळख अशी की येथे कुणालाही, हॉटेल सारखे ४ दिवस, खाण्यापिण्याच्या उत्तम व्यवस्थेसह राहता येते. वृद्धाश्रम म्हटले म्हणजे एक निराशा, हतबलता, असहाय्यता दाटून येते. पण येथे मात्र निवृत्तीनंतर जरी कायमचे जाऊन राहायचे असेल तरी तारांकित सोयी उपलब्ध आहेत. तुम्हाला जर खेड्यातील जीवन, शांतता, शून्य प्रदूषण, हटके बदल हवा असेल तर येथे आपण अगदी दोन दिवसांपासून कितीही दिवस, अगदी तहहयात सुद्धा स्वस्तात, उत्तम सुखसोयींसह राहू शकता. तुम्ही तिथे राहत असतांना, तुमची मुले, नातवंडे, नातेवाईकही तेथे येऊन, तुमच्या समवेत राहू शकतात.येथे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, नाश्ता उपलब्ध आहे. टीव्ही, इंटरनेट, वाचनालय, वैद्यकीय सुविधा, जवळच दैनंदिन बाजार अशा गोष्टी उपलब्ध आहेत. या ‘ माझे आजोळ ‘ च्या मालकीची आमराई, फुलबाग, फळबाग, भाजीचा मळा त्याच परिसरामध्ये आहे. त्यामुळे बागकामाची आवड असणाऱ्यांना एक छान संधी उपलब्ध आहे.*

*भरतने येथे Authentic Village Tourism आणि Old Age Resort याची उत्तम सांगड कशी घातली आहे, वृद्धाश्रम म्हणजे घरच्या माणसांनी सक्तीने लादलेले एकाकीपण, असहाय्यतेने जगण्याचे स्थान झाले आहे. पण या ‘ माझे आजोळ ‘ येथे तुम्हाला स्वत:च्या इच्छेने, उर्वरित आयुष्य आनंदाने, सन्मानाने आणि आपल्या सोयीने जगण्याची संधी मिळते.*

*चार दिवस हॉटेलसारखे किंवा अगदी आयुष्यभर मजेत राहण्यासाठी हा एक वेगळा उपक्रम आहे !*

*• पत्ता :माझे आजोळ, आर्यानगरी, मु. पो. तिरवडे, कसाल - मालवण महामार्ग, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.*

*• संपर्क: 88984 62537, 99204 33099, 94221 36961*


*www.maazeaajol.org*

( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा )  

   ***** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi