मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हर्षदा गरुड हिचे अभिनंदन वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक.
मुंबई, दि.3 :- जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
मावळमधील (जि. पुणे) हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत भारताने यापूर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, अशी कामगिरी केली आहे. "महाराष्ट्र कन्ये"चा हा पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment