Wednesday, 1 June 2022

 *हौसिंग सोसायटीची रिडेव्हलपमेंट म्हणजे काय असतं?*


*जुनं घर बिल्डरला द्यायचं आणि त्याच्या बदली फुकट, नवं, मोठ्ठ आणि आधुनिक सुखसोई असलेलं घर घ्यायचं!*


रिडेव्हलपमेंट म्हणजे जर इतकी सोपी गोष्ट असती तर इतके प्रोजेक्ट्स फेल गेलेच नसते!! खरं कि नाही?


मग रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी काय करायला हवं?


महेश गजेंद्रगडकरच्या म्हणण्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट हा सोसायटीच्या सभासदांच्या मानसशास्त्राच्या व्यवस्थापनाचा विषय आहे. हे व्यवस्थापन ज्यांना जमते तेच रिडेव्हल्पमेंट करण्यात यशस्वी होतात. हा महेशचा अनुभव आहे. कारण महेश १०० सभासद असलेल्या सोसायटीचा चेयरमन आहे. आणि तो त्याच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट करतो आहे..


महेश वकील असल्याने त्याला स्वानुभवाबरोबरच कायद्याचेही ज्ञान आहे. आणि आता रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॅन्सल्टंट हा त्याचा व्यवसाय झाला आहे.


माझ्या सोसायटीची रिडेव्हल्पमेंट करायची ठरल्यावर मला जेंव्हा भयंकर अनुभव आले तेंव्हा मी महेशकडे गेलो आणि रिडेव्हल्पमेंट कशी करावी हे समजून घेतले. 


मला रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या करण्याची पद्धत समजली पण माझ्या सोसायटीतल्या इतर सभासदांना हे कसे समजून सांगावे हा प्रश्नच होता. 


खरं तर महेश रिडेव्हल्पमेंटवर सेमिनार घेतो. सोसायटीत जाऊन सभासदांना मार्गदर्शन करतो..पण त्याकरता तो जी फी घेतो ती द्यायला माझ्या सोसायटीच्या रिडेव्हलोपमेंट कमिटीला पटवणं मला अशक्य होते. 


का अशक्य होते हे तुम्हाला माहीतच आहे. सोसायटीची रिडेव्हल्पमेंट हा फुकटचा खेळ आहे. बिल्डर सगळं करून देतो. फक्त जास्तीत जास्त टक्के वाढीव क्षेत्रफळ देणारा आणि "नावाजलेला" - म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर होर्डिंग लावणारा - बिल्डर पकडला की झालं. असं जगातल्या सगळ्या सोसायटीतल्या सगळ्यांचं मत असतं.


यावर उपाय म्हणून मी एक आयडिया केली. महेशला म्हटलं कॅमेऱ्या समोर बसून तू मला रिडेव्हलपमेंट कशी करावी हे शिकव. तो व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करतो.म्हणजे माझ्या सोसायटीतल्या लोकांना रिडेव्हल्पमेंट यशस्वी अशी करावी हे कळेल. त्यांचा सोईच्या वेळी ते घर बसल्या फुकट व्हिडिओ बघू शकतील. आणि मग त्यांना रिडेव्हल्पमेंट करण्याची योग्य पद्धत कळेल..आमची सोसायटी फसणार नाही. लटकणार नाही. अडकणार नाही. आणि मग तुझ्या सोसायटीसारखी माझीही सोसायटी रिडेव्हलप होईल.


महेश माझा खरा मित्र असल्याने तो लगेच तयार झाला. आम्ही विडिओ तयार केले. विषय फारच मोठ्ठा असल्याने त्याचे ४० - ५० मिनिटांचे ३ एपिसोड झाले. रिडेव्हल्पमेंटचा विचार मनात आल्या पासून बिल्डर अपॉईंट करेपर्यंत काय काय करावे याची सविस्तर माहिती यात आहे. रिडेव्हल्पमेंटची कायदेशीर प्रक्रिया, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्ट अँपॉईंट करणे, टेंडर कसे काढावे, एमओयू कसा करावा, बिल्डरबरोबरच्या अग्रीमेंटमध्ये कुठले कुठले मुद्दे असावेत वगैरे वगैरे सगळं यात सांगितलं आहे.


आज मी माझ्या सोसायटीला हे विडिओ बघण्याचं आग्रहाचं आणि कळकळीच निमंत्रण दिलय.     


तुमच्या सोसायटीत जर रिडेव्हलोपमेंटकरण्याचा बेत शिजत असेल तर तुम्हीही हे ३ विडिओ एपिसोड यूट्यूबवर जरूर बघा. आणि तुमच्या सोसायटीतल्या सगळ्यांना बघायला सांगा. म्हणजे मग रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी काय करायला हवं हे त्यांनाही माहिती होईल 

Part 1 - - https://youtu.be/Z0utipsa12o


Part 2 - - https://youtu.be/CC3JYxB-GDY


Part 3 - - https://youtu.be/76YXke3ULn4

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi