Monday, 7 March 2022

 

विधानसभा प्रश्नोत्तरे.

कोळगाव उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरचा गरजेप्रमाणे वापर

- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

            मुंबई, दि. 7 :- सोलापूर जिल्ह्यातील कोळगाव-जेऊर उपविभागातील धरणालगत असलेल्या कोळगाव उपकेंद्रात तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला होता, तो बंद पडलेला नाही तर त्याचा गरजेप्रमाणे वापर सुरु असून त्यामुळे कोणताही तोटा किंवा नुकसान झालेले नाही, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य संजयमामा शिंदे आणि बबनराव शिंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले की, कोळगाव उपकेंद्रातील 5 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरुन तीन वाहिन्यांद्वारे त्या भागातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. या पॉवर ट्रान्सफॉर्मरवरील भार कमी करण्यासाठी ३.१५ एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आला होता. त्यानंतर धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे आणि इतर कारणांमुळे तो ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आला. ३१ जानेवारी २०२२ रोजी ३ एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर या उपकेंद्रात कार्यन्वित करण्यात आला असून गरजेप्रमाणे त्याचा वापर सुरु आहे. हा ट्रान्सफॉर्मर बंद केल्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही हे राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी स्पष्ट केले.

००००


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi