Sunday, 6 March 2022

 🌹 *कोहळा* 🌹

घरात दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाणी असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.

*कोहळा लावण्याची योग्य पध्दत*

कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा. त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.

त्यानंतर खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेऊन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.

कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.

पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर....)

नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.

तरी पण जर सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या या वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा .

एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.

कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.

कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो

चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही.

एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ति त्या खालुन आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो .

( संग्रहित माहिती )


*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi