🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
💥🧿#महाशिवरात्री🧿💥
■■■■■■■■■■■
"भगवान" श्री महादेवांना "महाकाल" असे संबोधले जाते.!! "महाकाल" अर्थात ! 'शिव' हे भक्तांचे संकट निवारण करतातच परंतु भूत, पिशाच्च, करणी व बाधा आदी दुष्ट शक्तींना भक्तांच्या जवळही फटकू देत नाहीत.!!
(१):-मित्रांनो! आपल्या कडून देहाने ,वाचेने,मनाने, व कर्माने कळत-नकळत अनेक छोटे मोठे पापकर्म घडतच असतात!!
(२):-जागोजागी येणाऱ्या पिंपळ,वटवृक्ष आदीमध्ये देवतांचा वास असतो त्या वृक्षांची मुबलक प्रमाणाततोड केली जात असते.!!
(३):-पितरांची श्राद्धकर्मे वेळेत केली जात नाहीत.!त्यांना अन्न दिले जात नाही. त्यांचे तर्पण केले जात नाही.!!
(४):-परमात्म्याचे पूजन केले जात नाही. कुलदेवतेचे कुलाचार केले जात नाहीत.!या आणि अशा अनेक घडलेल्या पापांचे निर्मुलन व्हावे ,असे अनेकांना वाटत असते.! कुंडलीतील दोषामुळे कृत व गतकर्माची फळे भोगावी लागतात.!! त्यापासून मुक्तता हवी असते.!पूर्ववत पुन्हा आपले कुलाचार सुरू करावयाचे असतात. तेंव्हा भूतकाळातील पापकर्म दोष-परिहार व्हावा म्हणून प्रायःश्चित्त करण्यासाठी अत्यंत सोपे व सर्वश्रेष्ठ "व्रत" म्हणजे """प्रदोष शिवरात्री व्रत".!!!!!
त्यातही सर्वश्रेष्ठ फलदायी म्हणजे" "#महाशिवरात्री" होय.
ही पर्वणी वर्षातून एक वेळेस येत असते.!!
येणारी शिवरात्री माघ वद्य चतुर्दशी तिथीला दि.1 मार्च-2022 रोजी मंगळवारी असून तिचा निषिथ काळ हा मध्यरात्री 12-26 ते 1 वाजून 15 मिनिटापर्यंत म्हणजे एकंदर 49 मिनिटाचा असेल. हा अत्यंत महत्त्वाचा काल आहे.! याच कालात भगवान शिवाचे अस्तित्व संबंध पृथ्वीवर असणाऱ्या शिवपिंडीत (शिवलिंगात) सक्रीय असणार आहे म्हणून या कालावधीत केल्या जाणाऱ्या शिवपूजनाचे कोटी पुण्यफल भक्तांना प्राप्त होते ! शिवाय अनेक जन्माच्या पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे.!!!!
धर्मसिंधू या ग्रंथामध्ये हे व्रत कसे करावे याबद्दल अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे.!!
आपल्या सर्व माता भगिनी व बांधवांना ह्या व्रताची माहिती मी शिवाजी व्यास सोप्या भाषेत आपणास सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.- - - - !! याचा लाभ भक्तांनी जरूर घ्यावा !!
【१】--#संकल्प---
शिवरात्रीचे दिवशी अनशन व्रत(उपवास) घेतलेल्या भक्ताने शिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा. हा संकल्प बहुतांश लोकांना माहिती असतोच.!
महादेवाची पूजा करण्यापूर्वी
देहशुद्धी करून मनोमन पुढील संकल्प करावा!!!
---◆◆◆""● हे महादेवा!! माझ्या काया वाचा व मनाने जाणते अजाणतेपणी घडलेल्या पापांची निवृत्ती व्हावी!! तसेच ग्रहपीडा, पितृपीडा,अनिष्टशक्ती पीडा यांचा परिहार होऊन तुझी शुद्ध भक्ती मला प्राप्त व्हावी म्हणून हे "महाशिवरात्री" व्रताचे अंतर्गत पूजन मी यथा ज्ञानाने , यथा शक्तीने,यथा उपचारांने करत आहे !!!"" !!!●
संकल्प झाल्यावर खालील दोन (ऋचा) म्हणाव्या.!!----
("रात्रीं प्र पदये जननीं सर्वभूतनिवेशनीम् ।
भद्रां भगवतीं कृष्णां
विश्वस्य जगतो निशाम् ।।
संवेशिनीं संयमिनीं ग्रहनक्षत्रमालिनीम् । प्रपन्नोहं शिवां रात्रीं भद्रे पारमशीमहि ।।)
[समस्त प्राणीमात्रांना मातृतुल्य (मातेप्रमाणे) आधारभूत, कल्याणकारक समस्त जगताला आच्छादन करणारी,आणि कृष्णवर्णीय अशा रात्रीदेवीला मी शरण जातो. हे! सर्वाचा आधार असणारी, नियमबद्ध , ग्रहनक्षत्रस्वरूप अलंकार धारण करणारी शुभ आणि कल्याणप्रद रात्रीदेवी, शरणागत भक्तांना तू संकटपार पोहोचव !!]
【२】💥--- #पूजा---💥
संध्याकाळी कपाळी त्रिपुंड आणि हाती रुद्राक्षमाळा धारण करून शिवभक्तांने शिव मंदिरातील शिवलिंगांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यावेळी खालील ध्यान श्लोक म्हणावेत.!!
"ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।
रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् । पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्। विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।
[ रौप्यपर्वतासमान श्वेतकांती असणार्या सुंदर चंद्राला आभूषण म्हणून धारण करणार्या, वस्त्रालंकारानी उज्वल.शरीरयुक्त बनलेल्या, स्वतःच्या हातात परशु,मृग,वर, आणि अभय धारण करणार्या , प्रसन्न, पुष्पासनावर बसलेल्या, स्तुतिस्तोत्रगायक , देवतागणांनी वेष्टिलेल्या , व्याघ्राजीन घातलेल्या, विश्वाचे आदिकरण आणि जगदुत्पत्तीचे बीज स्वरूप अशा समस्त भयांचे निराकरण करणार्या तसेच पंचमुख आणि त्रिनेत्र अशा महेश्वराचे प्रतिदिनी ध्यान करावे.]
【३】🏵️:-पंचामृतस्नान :-🏵️
गायीचे दूध दही, तूप, मध,साखर हे एकत्रित करून किंवा फक्त दुधाने भक्तीपूर्वक स्नान घालावे. ।।शिवाय नमः।। या मंत्राचा उच्चार सतत चालू ठेवावा.!!
【】🌻-शुद्धोदकस्नान-🌻
तांब्याच्या भांड्यातील शुद्ध पाण्याने वरील मंत्र म्हणत म्हणत शिवाला स्नान घालावे.!!
【५】♨️--#अभिषेक--♨️
शुद्धोदक स्नान घातल्यानंतर चंदन, केशर आणि कापूर मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगास अभिषेक करावा. (रुद्राध्याय, पुरुषसुक्त आदी मंत्राने) जमत नसल्यास --
।।ओम् नमःशिवाय ।।
या सोप्या मंत्राने देखील अभिषेक कला तरी चालतो. शेवटी श्रद्धेचेच फळ मिळते.!
【६】🌞-- #तर्पण-- 🌞
अभिषेक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीसमवेत खाली दिलेल्या आठ नावाचा उच्चार करून तर्पण करावे.--!!!
(उदा:-ओम् भवाय तर्पयामि याप्रमाणे खालील नावाने)
(१)-भव (२)-शर्व (३)-ईशान (४)-पशुपति (५)-उग्र (६)-रुद्र (७)-भीम (८)-महादेव.
【७-- ☸️-- #जप : --☸️
तर्पणानंतर शिवलिंगास एकहजार आठ अथवा एकशेआठ बेलाची पाने
वहावीत.त्यावेळेस जमल्यास शिवसहस्रनाम स्तोत्र म्हणावे अथवा - ।।शिवाय नमः।। या मूलमंत्राचा यथाशक्ती जप करावा.!!
【८】❇️-अन्य उपचार-❇️
शिवलिंगाला नैवेद्य, तांबुल,आणि मंत्रपुष्पांजली समर्पित केल्यानंतर खालील नावाने बारा पुष्पांजली अर्पण कराव्यात.!!
(१)-शिव (२)-रुद्र (३)-पशुपति (४)-नीलकंठ (५)-महेश्वर (६)-हरिकेश (७)-विरूपाक्ष (८)-पिनाकिन्(९)-त्रिपुरान्तक (१०)- शंभू (११)-शूलिन् (१२)-महादेव.
【९】-- ✳️-#प्रदक्षिणा-✳️
वरील प्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करून तसेच ।।शिवाय नमः।। या मूलमंत्राचा एकशेआठ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी.
शिवरात्रीचे हे व्रत भक्ताने बारा, चौदा अथवा चोविस वर्षे यथाशक्ती करून त्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे या भक्तांना मनोवांछित फल तर मिळतेच पण अंतकाली शिवलोक प्राप्त होतो. असे व्रत करणारे या आजच्या काळात क्वचितच सापडतात. उपवास, दर्शन शिवलीला श्रवण एवढेच पालन सध्या च्या काळात होत असलेले दिसून येते. निदान प्रत्येक भक्ताने हे महाशिवरात्री व्रत अवश्य करावे.------!!!!
🟦☸शिवाजी व्यास☸🟦
अध्यात्म--ज्योतिष अभ्यासक
संपर्क 8217897287
No comments:
Post a Comment