] Mahendra Gharat: मा. जिल्हाधिकारी रायगड, यांच्या सौजन्याने जिल्ह्यातील हुशार होतकरू परतुं आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा सर्व संवर्गातील युवक – युवतींकरिता शासकीय सेवांमध्ये प्रवेश सुलभ व्हावा याकरिता दीर्घकालीन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे. सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे प्रत्यक्ष तसेच दूरस्थ दृक्श्राव्य माध्यमातून विविध सेवेमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी, विविध विषयांचे तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रस्तुत कार्यक्रम प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दोन दिवसाकरिता असेल. सदर कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गावात, दुर्गम वाडी वस्ती पर्यंत पोहचावा करिता. प्रत्येक तलाठी कार्यालयाने प्रस्तुत कार्यक्रमाची गावात प्रसिद्धी द्यावी, तसेच गावातील होतकरू युवक – युवतींचे नाव नोंदणी करावी.
[] Mahendra Gharat: *स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून पेण येथे "गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र" होणार सुरू*
*प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे केंद्र असणार सुरू*
*अलिबाग,जि.रायगड,दि.1, (जिमाका):-* महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शनिवार, दि.4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता "गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र" सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे मार्गदर्शन केंद्र सुरू असणार आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे हे केंद्र सुरु होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि.2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मार्गदर्शन केंद्राचा लाभ मिळणार आहे.
तसेच कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पेण येथील या केंद्रावर हजर राहणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणाऱ्या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्यातून अधिक प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्येदेखील अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असा मानस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे
तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा raigadcomp@gmail.com या ईमेल वर अर्ज सादर करून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment