*मनोगत*
*पोलीस खात्यात 20 वर्षे नोकरी पूर्ण केल्यानंतर पोलिस हवालदार स्वेच्छा निवृत्ती(v.r.s) मंजुर करण्याकरिता डीसीपी यांच्या कॅबिन मध्ये गेल्यानंतर, डिसीपीने पोलिस हवालादर यांचे बराच वेळ मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला , शेवटी स्वेच्छा निवृत्ती मंजूर केली.*
*पण न राहून शेवटी एक प्रश्न विचारला " सर्व काही मिळत होते या नोकरीमुळे, तरी सुध्दा नोकरी का सोडत आहे तुम्ही ? "*
*त्यावर पोलीस हवालदार याने सुंदर हृदयस्पर्शी व मार्मिक उत्तर दिले.*
*"सर बऱ्याच वेळा पासून तुमच्या समोरील खुर्च्या खाली असून देखील मी गेल्या दोन तासापासून मी सावधान मध्ये उभा आहे. पण तुम्ही साधे माणुसकी सुद्धा तुम्ही दाखवत नाही आणि बसायला पण सांगत नाही,आणि हे अमानुष पणाचे वागणे आता मला सहन होत नाही, कारण वीस वर्षा पूर्वी जी ताकत माझ्या मध्ये सहनशीलतेची होती, ती आता संपलेली आहे पण तुमच्या पदा मधील इंग्रज अधिकाऱ्याची वृत्ती अजून काही बदलली नाही "*
*बस एवढेच कारण आहे नोकरी सोडण्याचे "*
_(हे पोलीस दलातील एक प्रतिकात्मक उदाहरण आहे अमानुष पणाचे आणि शिस्तीच्या नावाखाली समोरच्याला माणूस न मानण्याचे)_
*हे एक पोलिस दलातील बोलके उदाहरण असले तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात देखील थोड्याफार फरकाने दुर्दैवाने हिच परिस्थिती आहे. साक्षात देवाने पृथ्वीतलावर सर्व कामगार, कर्मचारी तसेच आपल्या अधिनस्थ शासकीय सेवा बजावणारे यांचेवर अधिराज्य गाजवण्यासाठीच आपल्याला पाठवले असल्याची भावना अधिकारी वर्गात निर्माण झालेली आहे.कर्मचारी वर्गावर अन्याय, तुच्छतेची वागणूक देण्यासाठीच शासनाने आपली नेमणूक केली असल्याची कांही* *सन्माननीय अपवाद वगळता नोकरशाह व अधिकारी वर्गाची भावना झालेली आहे 👏👏🙏🙏
कोणी लिहिली माहीत नाही, पण वस्तुस्थिती खरी आहे।
No comments:
Post a Comment