🎯 *पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी!*
💁♂️ आता पेन्शनधारक धारकांना येत्या काळात हयात (जिवंत) असल्याचा दाखला देण्याची गरज नाही. कारण त्यासाठी केंद्र सरकारनं एक वेगळी योजना आखली आहे.
🧐 पेन्शनधारकांनी दरवर्षी जिवंत असल्याचा दाखला दिला नाही तर त्यांची पेन्शन बंद केली जाते. पण आता पेन्शनधारकांची या दाखल्याच्या झंझटीतून सुटका होणार आहे.
👍 केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम ही हायटेक टेक्नोलॉजी आणणार आहे.
🗣️ टेक्नोलॉजीनुसार आता पेन्शधारकाचा चेहरा हाच जिवंत असल्याचा पुरावा असेल. राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्या हस्ते या नव्या तंत्रज्ञानाचं अनावरण करण्यात आलं.
🤓 *फेस रेकग्नायझेशन टेक्नॉलॉजी काय आहे?* :
● यानुसार बँकेला लिखित स्वरूपात हयातीचा दाखला देण्याची गरज नाही.
● बँक अधिकारी मोबाईल अॅपद्वारे पेन्शनधारकाच्या चेह-यांची पडताळणी करतील.
● चेहऱ्याचं स्कॅनिंग पूर्ण होताच संबंधित पेन्शनधारकाची अॅप्लिकेशनमध्ये नोंदणी होईल.
● हाच जिवंत असल्याचा डिजिटल पुरावा असेल.
💫 वयोमानामुळे अनेक पेन्शनधारकांना बँकेत जाता येत नाही. अशात ही नवी टेक्नॉलॉजी पेन्शनधारकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖
No comments:
Post a Comment