Wednesday, 8 December 2021

 प्राध्यापक हिरा राखुंडे यांना मुंबई भूषण पुरस्कार 

  मुंबई : ‘मुंबई भूषण’ पुरस्कार महाराजा यशवंतराव होळकर यांचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर आणि बाळूमामा मालिकेतील अभिनेते सुमित पुसावळे यांच्या शुभहस्ते प्रा़ हिरा राखुंडे यांना देण्यात आला़ हा सोहळा अत्यंत दिमाखदारपणे पार पडला. यावेळी आर्थिक व शारीरिक दुर्बल घटकासाठी केलेल्या सामाजिक कार्य करणाºया व्यक्तिंचाही सन्मान करण्यात आला. पुण्यश्लोक फौंडेशन आणि धनगर माझा यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार अनाथांचा नाथ, चला इंग्रजी बोलायला शिकू आणि घरोघरी निर्माण करू डॉक्टर व अभियंते या संकल्पना संस्थेने सुरू केल्या आणि त्या इतर गावातही सुरू झाल्या. कोरोना काळात सॅनिटायझरचे वाटप, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, थंडी तापाच्या गोळ्यांचे वाटप, सहकाºयांबरोबर अन्न धान्य वाटप असे अनेक उपक्रम राबवले. तसेच शालेय साहित्याचं वाटप, वृक्ष लागवड , डिजिटल साहित्य वाटप, अपंगांना मदत या संपूर्ण कार्याच्या निकषावर मुंबई भूषण पुरस्कार ठरविण्यात येऊन जाहीर करण्यात आला. हा पूरस्कार प्रा़ हिरा राखुंडे यांना देण्यात आला़ यावेळी धनगर माझाचे संपादक धनंजय ताणले, आयकर आयुक्त डॉ नितीनजी वाघमोडे, यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे, वीरकरवाडी गावचे स्थानिक प्रतिनिधी मार्केट कमिटी संचालक अमोल राऊत, माजी नगरसेवक आप्पा वीरकर, संजय वीरकर, राखुंडे वस्तीतील नागरिक, मुंबईमध्ये स्थायिक असलेले वीरकरवाडी आणि पंचकृषितील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi