नरकासुराला मारायला गेलेले श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचे हे रेखाचित्र.
नरकासुराने सोडलेले अस्त्र भेदून परत दुसरा वार सत्यभामा करते आहे. तिचा पवित्रा तर असा आहे बहुतेक पुढचा वार मर्मावरच असेल. ती दिसायला जितकी देखणी आहे तितकीच युद्धकुशल आहे.
आणि श्रीकृष्ण खाली बसलाय, गरूडावर. अस्त्र सोडतांना जो रिकाॅईल येईल (अधिक माहितीसाठी न्यूटनचा तिसरा नियम) त्यामुळे सत्यभामेचा तोल जाऊ नये म्हणून पायाने तिचा मागचा पाय अडवून ठेवलाय.
बायकोचे युद्ध कौशल्य पाहून त्याला कौतुक वाटते आहे.
त्याच्या हातात विश्वातले शक्तिशाली असे सुदर्शन आहे. ते सोडून सुद्धा त्याला युद्धाचा शेवट करता आला असता. पण बायको जेव्हा युद्ध करते आहे तेव्हा त्याने आडोसा धरलाय.
मध्यपूर्व आशिया तर सोडाच, पण पश्चिमी देशात सुद्धा हे असे दाखले नाहीत. हिन्दू धर्माव्यतिरिक्त कुठेही असा मुक्त विचार पहायला मिळणार नाही जो स्त्रीच्या कर्तृत्वाचा असा गौरव करेल.
No comments:
Post a Comment