Friday, 5 November 2021

 पैश्याचे योग्य नियोजन करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....


घरातील लक्ष्मीचा (आई, धर्मपत्नी, मुलगी,बहीण व मैत्रीण) यांचा योग्य सन्मान करणे हेच खरे लक्ष्मीपुजन....


अंथरून पाहून पाय पसरणे  हेच खरे लक्ष्मीपुजन.....


ज्यानी आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आर्थिक मदत केली...त्यांचे आयुष्यभर आभारी राहणे हेच खरे लक्ष्मीपुजन....


वडिलोपार्जित संपत्तीचे जतन व संवर्धन करून पुढच्या पिढीला सुपुर्द करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....


आपल्या अपत्यांना चांगले आचार, विचार व संस्कार देणे हेच खरे लक्ष्मीपुजन...


शिक्षण, आरोग्य व समाजोपयोगी कार्याच्या  आर्थिक बाबतीत  हातभार लावणे म्हणजेच खरे लक्ष्मीपुजन....


या विचाराने जो आचरण करी तयाचे घरी लक्ष्मी निवास करी...

🌹 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi