*यांची आठवण ठेवाच!!*
*आज वासुदेव बळवंत फडके यांची जयंती.*
*जन्म ४ नोव्हेंबर१८४५ पनवेल जवळ शिरढोण येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी सरकारी नोकरी (लष्कर लेखा) पत्करली होती पण आईच्या मृत्यू समयी त्यांना रजा मिळाली नाही. याचा राग मनात धरून त्यांनी नोकरी सोडली. महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी पुणेचे (MES) संस्थापक सदस्य होते. लहूजी वस्ताद यांचे कडून त्यांनी लढ्याचे शिक्षण घेतले. अज्ञातवासात असताना ते गोंदवले येथे आले होते. स्वामिनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला पण देशभक्तीने त पेटून उठले होते. तेथून ते गाणगापूर येथे आले असता त्यांना अटक झाली. शिक्षा होऊन त्यांना अरबस्थानातील येमेन मधील एडन येथे तुरुंगात ठेवण्यान आले. १३ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांनी तुरुंगाचे दार बिजागिरी तोडून मोडले व पळून गेले पण परक्या मुलखात ते लगेचच पकडले गेले. त्यानंतर त्यांनी उपोषण सुरु केले व त्यातच त्यांचा १७ फेब्रुवारी१८८३ रोजी अंत झाला. त्यांना आद्य क्रांतिवीर असे म्हंटले जाते .त्यांचे सविस्तर चरित्र प्रत्यकाने वाचले पाहिजे. शिरढोण येथे ते लहान पणी खेळत असलेली बोकडाची गाडी व त्यांचे घर पाहता येईल. मुंबई गोवा महामार्गावर पनवेल चे पुढे कर्नाळा किल्ल्या जवळच शिरढोण आहे.*
No comments:
Post a Comment