Saturday, 2 October 2021

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवांतर्गत 'पदव्युत्तर'साठी

तीस टक्के राखीव जागा असाव्यात

                                    - सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

          मुंबईदि. 1 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिका-यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीस टक्के जागा राखून ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सूचना दिल्या आहेत. 

          पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेतील वैद्यकीय अधिका-यांना राखीव जागा असाव्यातअशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने (मॅग्मो) केली आहे. त्या अनुषंगाने श्री. टोपे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.30) बैठक झाली.

          सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आदिवासीदुर्गम ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिका-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सेवांतर्गत वैद्यकीय अधिका-यांसाठी राखीव जागा असणे आवश्यक आहेत्यामुळे ग्रामीण भागात विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध होतीलही बाब श्री. टोपे यांनी अधोरेखित केली.    

          मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवैद्यकीय संचालक डॉ.दिलीप म्हैसेकरसंचालक डॉ. साधना तायडेमहाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे अध्यक्ष डॉ.राजेश गायकवाडपीजी सेलचे डॉ. गणेश काळे आदी उपस्थित होते.

          त्यावर बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यासप्रधान सचिव सौरभ विजय यांनी मते मांडली. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय डॉक्टरांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात तीस टक्के जागा वैद्यकीय शिक्षण विभागाने राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा केली जाईलअसेही सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  स्पष्ट केले.

           बैठकीस मॅग्मो संघटनेचे डॉ. गणेश काळेडॉ. अनिल सालोकडॉ.अशोक चव्हाणडॉ.जयवंत लोढेडॉ.सत्यराज दागडेडॉ. अभिजीत होसमनी आदी उपस्थित होते.

0000


 

आरक्षणामुळे अनाथांच्या भविष्याची वाट सोपी

·       अनाथ आरक्षण संवर्गातून नियुक्त अधिकारी नारायण इंगळे यांची भावना

            मुंबई दि.01 : राज्यातील अनाथालयांमध्ये राहून शिक्षण घेतलेल्या आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या अनाथ तरुणांच्या करियरची वाट आता सोपी झाली आहे. अनाथांसाठी नोकरीशिक्षणात एक टक्का आरक्षण लागू केल्यामुळे अनाथ संवर्गातून मी पहिला अधिकारी ठरलो आहेयाचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया नारायण इंगळे यांनी व्यक्त केली.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वनक्षेत्रपाल (RFO) म्हणून अनाथ संवर्गातून नारायण इंगळे यांची नियुक्ती झाली आहे. अनाथ संवर्गातून नियुक्ती झालेले श्री. इंगळे राज्यातील पहिले अधिकारी आहेत. याबाबत त्यांनी राज्य शासनमहिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आभार मानले. अनाथ संवर्गातून आरक्षणाचा लाभ यापुढे तरुणांना नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील संधीची दारे आता उघडली गेली असून त्यांच्यापुढे करिअरच्या दिशा मोकळ्या झाल्याची कृतज्ञ प्रतिक्रिया इंगळे यांनी व्यक्त केली आहे.          

      नारायण इंगळे हे मुळचे लातूर येथील आहेत. लातुर जिल्ह्यातील मुरूड येथे त्यांनी 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले व पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi