🚩🚩मारुती हे आपल्या पत्नी सोबत ।।।।अगदी दुर्मिळ फोटो आहे। त्यांचे मंदिर खम्माम या ठिकाणी आहे।।🚩🚩
🌞☀। जय श्रीहनुमान । ☀🌞
आपणास माहीत आहे का ?
मारुती विवाहीत होता !!
आपल्याला मारुती नाव काढल्यावर एकटा दिसणार, दुसऱ्या देवांसारखा पत्नीबरोबर दिसणार नाही. आपणास तसे पाहायचे असेल, तर आंध्र प्रदेशातील खम्माम जिल्ह्यात जावे लागेल. तेथे मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे. हे एकमेव मंदिर आहे. जिथे मारुती आपल्या पत्नी समवेत आहे.
मारुतीने विवाह का केला ?
अशी आख्यायिका आहे की, जेव्हा मारुती त्याचे गुरू सूर्य, ह्यांच्याकडून विद्या शिकत होते, तेव्हा त्याला ९ विद्यांपैकी ५ विद्या शिकवल्या, पण शिल्लक ४ विद्या शिकण्यासाठी विवाहीत असणे गरजेचे होते. (तशी अटच असते.) आजीवन ब्रह्मचारी राहाण्याचे व्रत घेतलेला मारुती खूपच बेचैन झाला. शिष्याला द्विधा मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी सांगितले की, तु माझ्या मुलीशी विवाह कर. सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती. मारुतीबरोबर विवाह करून सुर्वचला परत तपस्या करायला गेली. अशा प्रकारे मारुतीने विवाहाची अट पूर्ण केली होती आणि ब्रह्मचारी राहाण्याचे व्रतही पाळले होते. मारुतीच्या या विवाहाचा उल्लेख पराशर संहीतेमध्ये आहे.
खम्माम या ठिकाणी विवाहीत जोडप्याने येऊन त्या सपत्निक मारुतीचे दर्शन घेतले, तर त्या दांपत्यामध्ये प्रेम, सुख-शांती नांदते, अशी धारणा आहे...
🌹 जय श्री राम 🌹
No comments:
Post a Comment