Friday, 8 October 2021

 सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा

 

            मुंबई, दि. 3 : सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            सिधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 13  ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयकुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज या परीक्षा केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 18002100309पोलीस भरती मदत केंद्र कक्ष 02362-228008/  सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष - 02362228614 आणि bhartimahapolice@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलीस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

०००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi