Wednesday, 1 September 2021

 राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

            शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय  आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            शाळांमधील भौतिक सुविधांचा तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करून आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल. भौतिक सुविधांच्या विकासामध्ये स्वतंत्र शौचालयेपिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुस्थितीत असलेले वर्गआकर्षक इमारतक्रीडांगणक्रीडा साहित्य, ICT लॅबसायन्स लॅबग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश राहील.  तर शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक  वातावरण उपलब्ध  करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील याकडे लक्ष देण्यात येईल. शाळेच्या  ग्रंथालयामध्ये पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथइनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील.  स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही  याअंतर्गत राबविले जातील.

            आदर्श शाळेतील  विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील कौशल्यांचा विकास होईल याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाईल यामध्ये नवनिर्मितीला चालना देणारेसमीक्षात्मक विचारवैज्ञानिक प्रवृत्ती - संविधानिक मुल्ये अंगी बाणवणारेसोबत काम करण्याचे कौशल्य तसेच संभाषण कौशल्य  या सारखी अन्य कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येतील. 

            आज मंजूरी देण्यात आलेल्या 488 आदर्श शाळा च्या विकासासाठी 494 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

-----०-----

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi