स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांसाठी विशेष मोहिमेद्वारे भरती प्रक्रिया राबवावी
- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई दि. 15 : - स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष मोहीम राबवावी तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित निवृत्तीवेतनाबाबत राजस्थान सरकारच्या धर्तीवर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे नामनिर्देशित पाल्य यांना शासकीय सेवेत घेण्याबाबत शासनाच्या ४ मार्च १९९१ च्या परिपत्रकानुसार यापूर्वी ज्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी ही भरतीप्रक्रिया राबविली त्यानुसार नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व पुढील पदोन्नती देण्यात यावी.येत्या दोन महिन्यात सर्व जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची अद्यावत माहिती प्राप्त करून घ्यावी. ही माहिती देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर,सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सीमा व्यास,उपसचिव सं.के.गुप्ते, महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख व अन्य सदस्य उपस्थित होते.
00000
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी
- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई दि. 15 : - आगामी काळात शासनाच्या सर्व विभागांमध्ये पदभरती करताना उमेदवारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी व परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील पदभरतीच्या अनुषंगाने सुधारित परीक्षा पद्धती संदर्भात मंत्रालयात श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर, महाआयटीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव सुधीर निकाळे तसेच परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परीक्षा देणाऱ्या उमेदवाराची चेहरा ओळख सांगणारे तंत्रज्ञान तसेच जॅमर लावणे यासारख्या उपायांचा समावेश परीक्षा पद्धतीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी पेपर फुटूनये व डमी उमेदवार परीक्षेस बसू नये यादृष्टीने काळजी घ्यावी.परीक्षेत काही गडबड झाल्यास संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही
No comments:
Post a Comment