Saturday, 25 September 2021

 नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे

खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

·       आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे

 

            मुंबई, दि. 24 : नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

            यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणतात कीदुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

            धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्कसुरक्षित अंतरजंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi