मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले *"काय भाव आहे ?*
त्यांनी सांगितले : *"60 रूपये किलो ."*
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*
तो बोलला : *"20 रूपये किलो"*
मी विचारले :"इतका कमी भाव .?
तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती *मित्र..समाज* आणि *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...
मैत्रीला वेळ द्या.
🌹🌹🙏🙏🌹🌹सुप्रभात🌹🌹
No comments:
Post a Comment