नवीन मूल जन्माला आल्यावर सोयर पाळतात.
- आईला १० दिवस
- इतरांना ३ दिवस
या काळात काय करु नये, करावे?
- देवधरात जाऊ नये.
- देवपूजा करु नये
- देवळात जाऊ नये
- जिथे पूजा/यज्ञ इ. शुभकर्मे चालू असतील अशा ठिकाणी जाऊ नये
- ----------------------------------
सुतक (मृताशौच)
व्यक्ती मृत पावली असता त्या व्यक्तीच्या कोणत्या नातेवाईकास किती दिवस सुतक असते?
१) गर्भपात झाला असता -
आईला - पाचव्या महिन्यात ५ दिवस, सहाव्या महिन्यात ६ दिवस
इतरांना - ३ दिवस
२) मृत निपजल्यास - १० दिवस
३) वडील गेल्यास
- मुलास - १० दिवस
- विवाहित मुलीस - ३ दिवस
४) आई गेल्यास
- मुलास, अविवाहित मुलीस - १० दिवस
- विवाहित मुलीस - ३ दिवस
५) सख्खे/चुलत/चुलत-चुलत - पणजोबा-पणजी, आजोबा-आजी, काका-काकू गेल्यास
- विवाहित मुलास - १० दिवस
- अविवाहित - स्नानाने शुध्दी
- कन्येस - स्नानाने शुध्दी
६) मुलगा/पुतण्या/नातू/पणतू गेल्यास
मृताची मुंज न झाल्यास - ३ दिवस
मृताची मुंज झाल्यास - १० दिवस
७) मुलगी/पुतणी/नात/पणती गेल्यास
मृत अविवाहित असेल तर - ३ दिवस
मृत विवाहित असेल तर - ३ दिवस
८) भाऊ/भावजय गेल्यास -
भावाला - १० दिवस
विवाहित बहिणीस - भाऊ विवाहित असेल तर ३ दिवस
९) बहिण गेल्यास
मृत विवाहित असेल तर भावास - १-१॥ दिवस
विवाहित बहिणीस - ३ दिवस
मृत अविवाहित असेल तर - भावास - ३ दिवस
१०) बायको/नवरा गेल्यास
१० दिवस
११) आत्या मृत झाल्यास
- ३ दिवस
१२) मंत्रोपदेश करणार्या गुरुचे निधन झाल्यास - ३ दिवस🤭🤭🤭🧐🧐🧐
No comments:
Post a Comment