*झाडूशी संबंधित प्रथा :*
*लक्ष्मी कृपेसाठी करा 3 झाडूंचा हा एक उपाय *
*झाडू एक सामान्य वस्तू आहे परंतु शास्त्रामध्ये या वस्तूचा संबंध महालक्ष्मी कृपेशी सांगण्यात आला आहे. झाडू आपल्या घरातील कचरा रूपातील दरिद्रता दूर करते आणि साफ-सफाई रुपात लक्ष्मीची कृपा प्रदान करते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.*
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराजवळील एखाद्या मंदिरात तीन झाडू ठेवून या. ही प्राचीन काळापासून सुरु असलेली प्रथा आहे. प्राचीन काळी लोक मंदिरात झाडू दान करत होते.
*लक्षात ठेवा या गोष्टी...*
-----------$$$----------------
- सकाळी ब्रह्म मुहुर्तामध्ये मंदिरात झाडू ठेवावेत.
- हे काम एखाद्या विशेष दिवशी करण्यात यावे. विशेष दिवस म्हणजे एखादा सण, ज्योतिषातील शुभ योग किंवा शुक्रवार.
- हे काम कोणालाही न सांगता गुप्त स्वरुपात करावे. शास्त्रामध्ये गुप्त दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
- ज्या दिवशी हे काम करावयाचे आहे, त्यापूर्वी एक दिवस अगोदर तीन झाडू बाजारातून खरेदी करून आणावेत.
झाडूमुळे दूर होते नकारात्मक उर्जा
जर घरातील कचरा, धूळ, जाले-जळमट चांगल्या प्रकारे स्वच्छ केला नाहीत तर घरातील वातावरण नकारात्मक होते. झाडूमुळे ही घाण दूर केली जाते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. नकारात्मक वातावरणात राहणाऱ्या लोकांचे विचाराची नकारात्मक होऊ शकतात. याचा प्रभाव घरातील आर्थिक स्थितीवर पडू शकतो. घरात साफ-सफाई, स्वच्छता केल्यास या समस्यांना सामोरे जावे लागत नाही तसेच देवी-देवतांची कृपा प्राप्त होते.
- शास्त्रामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे रुप मानण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे झाडूचा अनादर करू नये.
*- झाडूला दरवाजामागे ठेवणे जास्त शुभ राहते.*
*- झाडू कधीही उभा ठेवू नये. हा अपशकून मानला जातो.*
*- आजही अनेक लोक झाडूला पाय लागल्यानंतर झाडूला प्रणाम करतात.*
*- जेव्हाही तुम्ही नवीन घरामध्ये जाणार असाल तेव्हा नवा झाडू घेऊन घरामध्ये प्रवेश करावा. हा शुभ शकुन मानला जातो. यामुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. नवीन घरामध्ये सुख-समृद्धी येते.*
*- जर घरामध्ये एखादे लहान मुल अचानक झाडून काढू लागले तर समजावे की एखादा पाहुणा घरामध्ये येणार आहे.*
*- लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये. असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते. सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी, कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करत असते.*
*जेव्हा झाडूचे काम संपते तेव्हा कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवा. झाडू इतरांच्या दृष्टीस पडल्यास घरात कलह होतात, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. झाडूला पाय लागणे म्हणजे झाडूचा अपमान करणे होय. त्यामुळे झाडू नेहमी लपवून ठेवतात. असे केल्याने घराला बरकत येते.*
🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment