Friday, 17 September 2021

 मुंबईत 20 सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 

            मुंबईदि. 14 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगर आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयमुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहे. यासाठी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सारखे असणाऱ्या किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे (Skype, Whatsapp,etc) द्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे. नोकरी इच्छूक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले-स्टोअरमधून mahaswayam ॲप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉग-इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासाठी अर्ज करावेअसे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.वि.गवंडी यांनी केले आहे.

000


 

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु

 

            मुंबईदि. 14 : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असल्याचे कळविले आहे.

            कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 31 ऑगस्ट 2021 पर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती दि. 31 ऑगस्ट 2021 च्या पुढे वाढविलेली नसल्यामुळे प्राधिकरणाने दि. 20 सप्टेंबर 2021 पासून प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी पारीत केले आहेत. असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाचे सचिव यशवंत गिरी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

            राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाचे सचिव यशवंत गिरी यांनी काढलेले आदेश सोबत जोडले आहे.    

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi