Thursday, 5 August 2021

 दिव्यांगांना शक्ती देण्यासाठी

सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता

 - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

·        ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

 

            मुंबई, दि. 05 : दृष्टिहीन असून काम करू शकणारी व्यक्ती असामान्य असते. दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा त्यांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

            नाशिक येथील ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने अंध दिव्यांग बांधवांसाठी निर्मिलेल्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या पुस्तकाचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन करण्यात आले.

            संगणकाची ओळखसॉफ्टवेअरहार्डवेअरडेटा एन्ट्री आदी विषयांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला असून5 भागांतील या पुस्तकाचे लेखन श्री. हेमंत दवे व श्रीमती गौरी कापुरे यांनी केले आहे. या प्रकाशन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरुण बारस्करसंचालक अर्जुन मुद्दामानद अध्यक्ष सौ. कल्पना पांडेउपाध्यक्ष विश्वासराव गायकवाडकोषाध्यक्ष विजया दवे आदी उपस्थित होते.

            संस्थेने ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रिंटिंग करण्यासाठी विभागाकडे मागणी केली असूनत्यास श्री. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अद्ययावत प्रिंटर उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. राज्यातील अंध बांधवांना ब्रेल लिपीतून संगणकाची माहिती देणारे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.मुंडे यांनी राज्य सरकारच्या वतीने ब्लाइंड वेल्फेअर संस्थेचे आभार मानले.

००००


 

परदेश शिष्यवृत्ती योजनेत आणखी 50 जागा याच वर्षी वाढविण्यात येणार

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

·        योजनेच्या निकषात सुधारणा करण्यासाठी बैठक

·        आर्ट्स व डिझाईन विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालये क्यू एस रँकिंगमध्ये 300 मध्ये बसत नसल्याने सब्जेक्टवाईज रँकिंग ग्राह्य धरून दिला जाणार लाभ

           

            मुंबई, दि. 5 : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी संख्या 75 वरून वाढवून 200 पर्यंत करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असूनआणखी 50 जागांची वाढ याच वर्षीपासून करण्यात येईल तसेच याच शैक्षणिक वर्षात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            परदेश शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या काही निकषात सुधारणा करण्यासंबंधी सह्याद्री अतिगृह येथे श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदमअपर मुख्य सचिव अरविंद कुमारसह सचिव दिनेश डिंगळेआयुक्त प्रशांत नारनवरे यांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            कला शाखेतील फाईन आर्ट्सफिल्म मेकिंगऍनिमेशनडिझाईन आदी विषयात परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात शिक्षण देणारी महाविद्यालय जागतिक क्यू एस रँकिंग च्या 300 मध्ये येत नसल्यामुळे लाभ मिळत नव्हता. त्यामुळे क्यू एस रँकिंग सोबतच क्यूएस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सब्जेक्ट रँकिंगचा पर्याय ग्राह्य धरण्यात यावा, कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही या योजनेतून लाभ देता यावाया अनुषंगाने निकषात बदल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

            महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युरोपियन विद्यापीठांचे आकर्षण आहेपण सोबतच दक्षिण कोरियातील अनेक विद्यापीठे दर्जेदार त्यांच्याकडील शिक्षणामुळे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी आले आहेतया विद्यापीठांकडे देखील विद्यार्थी आकर्षित होतीलया दृष्टीने काही उपाययोजना करण्याचे यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सुचवले.

            राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेची अर्ज करण्यापासूनची सर्व निवडप्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावीतसेच यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ व प्रशासकीय खर्चाची तरतूद करून देण्यात येईल. यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश श्री. धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi