Monday, 9 August 2021

 साथी हाथ बढाना रे.....


महाड मध्ये आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने महिला, मुलींच्या जिवनावश्यक वस्तूंच्या तसेच अत्यावश्यक वस्त्रांची कमतरतेने आरोग्यविषयक, सामाजिक राहणीमान समस्यांचे विदारक परिस्थिती ओम शिवशक्ती ग्रामविकास मंडळ, पाथरशेत, ता-रोहा चे अध्यक्ष श्री. रामदास कोदे, शांतारामभाऊ फिलसे प्रतिष्ठान, महाड यांचे अध्यक्षा मृणाल फिलसे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सखाराम कदम, प्राथमिक शिक्षक, माणगांव रहिवासी यांनी लक्षवेधी मास मिडीया प्राय लि, श्रीमती वैशाली भगत, संचालिका यांचे निदर्शनास आणून दिली असता लक्षवेधी मास मिडीया तर्फे रु ३०,०००/- अक्षरी रु तिस हजार मात्र महिलांचे वस्त्र खरेदीसाठी अदा केले.


सदर रक्कमेतून महिलांचे अत्यावश्यक वस्त्र दि ५/८/२०२१ रोजी मौजे-आकले गांव रोहिदास वाडी, महाड येथे माणगांव येथील लक्षवेधी मास मिडीयाच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती साक्षी कदम, श्री शिवसमर्थ महिला मंडळाचे प्रतिनिधी श्रीमती दर्शना शिंदे, श्रीमती सिध्दी पिलनकर यांचे सहकायाने वस्त्रप्रावरणाचे महिलांना वाटप करण्यात आले.


श्री शिवसमर्थ महिला मंडळाच्या कार्यकत्यांनी शांतारामभाऊ फिलसे प्रतिष्ठानचे वतीने तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री सखाराम कदम यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन वेळेवरच महिलांचे समस्यांचे निरसन करण्यात अमूल्य वेळ दिला हयाबध्दल त्या सर्वांच धन्यवाद व भविष्यात ही सामाजिक समस्यांची जाणीव वेळेवर दिल्यास सहकार्य करण्यात येईल साथी हाथ बढाना, असे लक्षवेधी मास मिडीयातर्फे श्रीमती साक्षी कदम, जनसंपर्क अधिकारी माणगांव यांनी सूचित केले.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi