Monday, 30 August 2021

 टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 

मुंबईदि. 29 :- टोकियो येथील पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिला टेबल टेनिसचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेले ऑलिंपिक पदक देशातील युवकांनादिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडविण्यासाठी प्रेरणा देईलअसा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

          उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात कीभाविनाबेन पटेल यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीतखडतर परिश्रमांतून देशाला ऑलिंपिक रौप्यपदक जिंकून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ऑलिंपिक रौप्यपदक जिंकण्याचा चमत्कार घडवला आहे. त्यांचं यश हे देशाचा गौरव वाढवणारं आणि देशवासीयांना प्रेरणा देणारं आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भाविनाबेन पटेल यांचं कौतुक केलं आहे.

00

 

 

 

 

पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकून रचला इतिहास

क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडून अभिनंदन

मुंबईदि. 29 :भारताच्या भाविनाबेन पटेलने पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे कैातुकोद्गार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी काढले आहे.

           श्री.केदार म्हणाले, भाविनाबेन पटेल ह्या सामान्य कुटुंबातील  असून कठोर परिश्रम घेऊन भाविनाने भारताला पहिलं पदक जिंकून दिले आहे. टेबल टेनिसमध्ये तिने अंतिम फेरी गाठली. पण सुवर्णपदकाने तिला हुलकावणी दिली. मात्र तिने रौप्य पदक जिंकलं आहे.  पॅरालिम्पिकमध्ये  भारताचे हे पहिले पदक आहे. भाविना यांनी रौप्य पदक जिंकत इतिहासही रचला. पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi