राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीतून
प्रत्येक आपत्तीग्रस्ताला आधाराचा, पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न
- उपमुख्यमंत्री अजित पवार
· आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी भविष्यात अधिक निधी देण्याची शासनाची तयारी
मुंबई, दि. 3 : राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत, पुनर्बांधणी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी 11 हजार 500 कोटींच्या तरतूदीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. यापैकी साडेअकरा हजार कोटींपैकी 1500 कोटी नागरिकांच्या आर्थिक मदतीसाठी, 3000 कोटी पुनर्बांधणीसाठी, 7000 कोटी आपत्ती सौम्यीकरण कामासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. राज्यातल्या प्रत्येक आपत्तीग्रस्ताला आर्थिक, नैतिक, सामाजिक आधार देऊन पुन्हा उभे करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या निधीचे तत्परेने वितरण केले जाईल. आवश्यकतेनुसार भविष्यात अधिक निधी उपलब्ध करण्याची शासनाची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment