घरगुती हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण कायदा २००५
आश्रय गृह (Shelter Home) घोषीत करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण - २००६/प्र.क्र. २९५/का-२
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
दिनांक : २१ डिसेंबर, २००६
प्रस्तावना :- घरगुती हिंसाचारापासून महिलांचे
संरक्षण कायदा २००५, दि. १४/९/२००५ पासून जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात प्रकाशित
करण्यात आला असून तो दि. २६/१०/२००६ पासून अंमलात आला आहे. तसेच केंद्र शासनाच्या महिला
व बाल विकास मंत्रालयाच्या दि. १७/१०/२००६ च्या अधिसूचने अन्वये या कायद्याचे नियम
तयार करण्यात आले असून ते दि. २६/१०/२००६ पासून अंमलात आले आहेत. या कायद्यातील कलम
२ (ट) अन्वये राज्य शासनाने आश्रय गृह (Shelter Home) घोषीत करावयाचे असल्याने सदरचा प्रस्ताव शासनाच्या
विचाराधीन होता.
शासन निर्णय :- वरील प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे
घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ मधील कलम २ (ट) अन्वये या कायद्याची
अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील सर्व राज्यगृहे,
आधारगृहे, स्वाधारगृहे व अल्प मुदती निवासगृहे या सर्व गृहांना आश्रय गृह (Shelter Home) म्हणून घोषित करण्यात येत
आहे.
२. यावरील होणारा खर्च त्या-त्या संबंधीत राज्यगृह/आधारगृह/स्वाधारगृह/अल्पमुदती
निवासगृहांच्या उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
नावाने.
(श. पा. वारे)
उप
सचिव, महाराष्ट्र शासन
No comments:
Post a Comment