Monday, 20 May 2019

अस्थीविसर्जन परंपरा बंद

अस्थीविसर्जन परंपरा बंद

हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा जुन्नर मधील गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता घरासमोर फळ देणारे झाड लावून केले जाणारं आहेत.

जुन्नर तालूक्यातील आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसं गाव चावंड गावाची लोकसंख्या जेमतेम एक हजार. गावातील तरूणांनी एकत्र येत चार वर्षांपूर्वी जनकल्याण सेवक संस्था  स्थापना केली. या मार्फत अनेक योजना राबविल्या जातात. यावर्षीपासून गावात अस्थिविसर्जन बंद करण्यात आलं आहे. तर फळझाडाच्या मुळात मृतव्यक्तीच्या घरासमोर या अस्थिविसर्जित केल्या जातायेत.

घरासमोर लावलेली झाडं आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना इथले गावकरी व्यक्त करतायत.

सहा महिन्यांपुर्वी वडीलांच्या निधनानंतर  घरासमोर लावलेल्या आंब्याच्या झाडाला आता बहर आला आहे.

दिड वर्षापुर्वी सुरू झालेल्या या नव्या परंपरेनंतर ५१ कुटुंबांनी अशी झाडं लावली आहेत. आणि या झाडांची ते काळजीही घेतायत. यातून पर्यावरणालाही मदत होतेय हे नक्की.

एका छोट्या गावातल्या तरूणांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेल्या या नव्या संकल्पनेचं सगळ्यांकडून कौतूक होतं आहे. 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi