Sunday, 28 April 2024

निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

 निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांची

जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास भेट

 

            मुंबईदि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम  सनियंत्रण कक्षास 26- मुंबई उत्तर मतदारसंघासाठी नियुक्त खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक नेहा चौधरी यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली.

            यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागरअपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडउपजिल्हाधिकारी सुभाष काकडेनिवडणूक निरीक्षकांच्या संपर्क अधिकारी अनुपमा पाटील आदी उपस्थित होतेश्रीमती चौधरी या भारतीय राजस्व सेवेतील (आयआरएसवरीष्ठ अधिकारी आहेत. 26- मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 152- बोरीवली, 153- दहिसर आणि 154- मागाठणे मतदारसंघातील खर्चविषयक बाबींचे निरीक्षक म्हणून श्रीमती चौधरी काम पाहतील.

            निवडणूक निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची  माहिती घेतलीजिल्हाधिकारी श्रीक्षीरसागरअपर जिल्हाधिकारी श्रीगोहाड यांनी त्यांना माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहितीसह दैनंदिन सादर करण्यात येणाऱ्या अहवालांची माहिती दिलीमाध्यम कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.

 

00000


मुंबईकरांनो 20 मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा गायक शान यांचे आवाहन : खार परिसरात मतदान जनजागृतीसाठी निघाली रॅली

 मुंबईकरांनो 20 मे रोजी कुठेही जाऊ नकामनापासून मतदान करा

गायक शान यांचे आवाहन : खार परिसरात मतदान जनजागृतीसाठी निघाली रॅली

 

मुंबईदि. 28 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेया दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावेअसे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले.

            लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेतया उपक्रमांचा एक भाग म्हणून 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 177- वांद्रे पश्चिम मतदारसंघांतर्गत मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीपकार्यक्रमांतर्गत आज सकाळी आरव्हीटेक्निकल स्कूलरामकृष्ण मार्गखार जिमखाना येथून ‘व्होट टू व्होट रॅलीचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते            यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉभागवत गावंडेप्राचार्या नेहा जगतयानी, स्वीपच्या नोडल अधिकारी मेधा कांबळे नायब तहसिलदार निखिल घाडगे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

            गायक श्रीशान म्हणाले कीआपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहेप्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 20 मे 2024 रोजी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असल्यास ते एक दिवस पुढे ढकलावेमी सुद्धा मतदानाच्या दिवशी मुंबईतच राहणार असल्याचे गायक श्रीशान यांनी सांगितले.   

            रॅलीत गायक श्रीशान यांच्यासह सहभागी नागरिकांनी ‘आपलं मत आपला अधिकार’, ‘बुढे हो या जवानसभी करे मतदान’, ‘माय व्होटमाय फ्यूचर’, ‘आपका व्होट आपकी ताकतआपका मत आपका अधिकार’ आदी घोषणाही दिल्याया रॅलीत नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीनागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 मुंबईकरांनो 20 मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा


गायक शान यांचे आवाहन : खार परिसरात मतदान जनजागृतीसाठी निघाली रॅली


 


मुंबई, दि. 28 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले.


            लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 177- वांद्रे पश्चिम मतदारसंघांतर्गत मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत आज सकाळी आर. व्ही. टेक्निकल स्कूल, रामकृष्ण मार्ग, खार जिमखाना येथून ‘व्होट टू व्होट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भागवत गावंडे, प्राचार्या नेहा जगतयानी, स्वीपच्या नोडल अधिकारी मेधा कांबळे नायब तहसिलदार निखिल घाडगे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.


            गायक श्री. शान म्हणाले की, आपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 20 मे 2024 रोजी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असल्यास ते एक दिवस पुढे ढकलावे. मी सुद्धा मतदानाच्या दिवशी मुंबईतच राहणार असल्याचे गायक श्री. शान यांनी सांगितले.   


            रॅलीत गायक श्री. शान यांच्यासह सहभागी नागरिकांनी ‘आपलं मत आपला अधिकार’, ‘बुढे हो या जवान- सभी करे मतदान’, ‘माय व्होट- माय फ्यूचर’, ‘आपका व्होट आपकी ताकत- आपका मत आपका अधिकार’ आदी घोषणाही दिल्या. या रॅलीत नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 

दिलखुलास' या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची मुलाखत

 'दिलखुलास' या कार्यक्रमात सांगली

जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची मुलाखत


 


            मुंबई: दि,28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात लोकसभा निवडणूकीच्या पुर्वतयारी संदर्भात सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची 'कायदा व सुव्यवस्था ' या विषयावर सोमवार दि. २९ एप्रिल २०२४ रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत सांगली जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी घेतली आहे.


            जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाची निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेले काम, सायबर सुरक्षितता,विविध नियमावली,आदर्श आचारसंहिता काय करावे आणि करू नये,मतदानाची टक्केवारी वाढवणे यासाठी सुरू असलेले उपक्रम याची माहिती ‘याविषयी 'दिलखुलास' कार्यक्रमातून सांगली जिल्हयाचे पोलिस अधीक्षक श्री. घुगे यांनी माहिती दिली आहे

.


खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा

 खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा


 


        मुंबई, दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.


            या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, आयकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, खर्च विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा घेत त्यांनी केलेल्या तयारीची माहिती करून घेतली. तसेच राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देश दिले.


            खर्च निरीक्षकांची नागरिक भेट घेऊ शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 93214-05417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, तर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक - 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधू शकतात, असे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी केले आहे.


00000

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई शहरात विशेष उपक्रम

            मुंबईदि. २८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष उपक्रम राबविले जात आहेत.

            त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील रुपारेल महाविद्यालयात `कॅपॅसिटी बिल्डिंग अँड लाईफ ट्रान्सफॉर्मेशन टेक्निकया विशेष प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले होते.  प्रशिक्षण कार्यक्रमात १८१-माहिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारीपर्यवेक्षकक्षेत्रीय अधिकारीमुंबई महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या इमारतीमधील रहिवासीसोसायटीचे अध्यक्षवैद्यकीय अधिकारीआरोग्यसेविकाअंगणवाडी सेविका व मदतनीस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            यंदाच्या निवडणुकीत २० मे २०२४ रोजी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निर्धार केला तर आपण नक्की एक सदृढ आणि सक्षम लोकशाहीकडे वाटचाल करूअसे `स्वीप`चे समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

            निवडणुकीचे काम हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. एक दिवस देशासाठी या भावनेतून आपण सर्वांनी या कामात शंभर टक्के योगदान दिले पाहिजे. निवडणुकीच्या कामात शासन आणि मतदारांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आपण सर्व आहात. जर आपण सर्वांनी ठरविले तर मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी जास्तीत-जास्त वाढवू शकतो. आपल्या या कामात जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य राहीलअसे डॉ. दळवी यांनी सांगितले.

            मतदानावेळी मतदारांना प्रेरित करण्यासाठी बूथ अवेअरनेस ग्रुप ( BAG ) सदस्यांनी प्रत्येकी २० घरांची जबाबदारी स्वीकारून मतदारांना प्रेरित व प्रोत्साहित करण्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावेअसे आवाहन डॉ. दळवी यांनी केले.

            निर्भयपणे व निष्पक्षपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडण्यासाठी आम्ही मतदान करणारअसा संकल्प याप्रसंगी उपस्थितांनी केला.

            या प्रशिक्षणाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पानवेकरअतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदमनायब तहसीलदार चंद्रशेखर चांदोरकरमाहिम विभागाचे `स्वीप`चे समन्वय अधिकारी प्रकाश भंडारी हे उपस्थित होते.

0000

आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता' विषयावरील चर्चासत्र संपन्न कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा : राज्यपाल रमेश बैस

             आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताविषयावरील चर्चासत्र संपन्न

कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा : राज्यपाल  रमेश बैस

 

            मुंबईदि. २८ : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार  यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत.  विशेषतः विविध प्रकारचे कर्करोगहृदयविकारत्वचा रोगदंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत.  मात्र या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोगनिदान व उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजेअसे आग्रही प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  

            नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या 'आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताया विषयावरील एक दिवसाच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते.

            गेल्या दोन शतकांमध्ये लसीकरणबधिरीकरणमेडिकल इमेजिंगप्रतिजैविकेअवयव प्रत्यारोपणस्टेम सेल थेरपी इत्यादी महत्वपूर्ण स्थित्यंतरे झाली आहेत . कृत्रिम प्रज्ञा हे क्रांतिकारी तंत्रज्ञान देखील वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारे असेल असे सांगून कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

            डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावेअसे राज्यपालांनी सांगितले.  कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने व्हावा तसेच रुग्णाच्या आजाराबाबत योग्य ती गोपनीयता जपली  जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

            राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस माजी फेलो दिवंगत डॉ बी के गोयल व  डॉ एल एच हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले.  अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ केवल  तलवारडॉ. पी. व्ही. देसाईडॉ. बी. एस. सिंघलडॉ. सरोज गोपालडॉ. अशोक गुप्ता, डॉ. देवेन तनेजाडॉ. नादीर भरुचाडॉ. सुनील पंड्याडॉ. सतीश खाडिलकर, डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले. 

            चर्चासत्राला नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. शिव कुमार सरीननियोजित अध्यक्ष डॉ. दिगंबर बेहराचर्चासत्र आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश खाडिलकरसहाध्यक्ष             डॉ. अशोक गुप्ताबॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ. राजकुमार पाटील,  हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. अनिल शर्मातसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.

000

 

 

 

 

Maharashtra Governor inaugurates Conference on AI in Healthcare

 

            Mumbai, 28 - Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a Mid Term Annual Conference on Artificial Intelligence in Health Services and Medical Education at Bombay Hospital in Mumbai on Sun (28 April).

            The Conference was organised by the National Academy of Medical Science and Bombay Hospital Institute of Medical Sciences.

            Describing Artificial Intelligence as revolutionary technology that is set to alter the perspective of healthcare, the Governor expressed the hope that AI will help in reducing the cost of diagnosis and treatment. While appealing to the doctors and specialists to harness the power of technology, the Governor asked them to maintain good communication and personal touch with the patients.

            The Governor felicitated past Chairpersons and Fellows of NAMS on the occasion. Dr B K Goyal (posthumous), Dr L H Hiranandani (posthumous), Dr Ashok Gupta, Dr Satish Khadilkar, Dr Arun Jamkar were among those felicitated on the occasion.

            Chairman of National Academy of Medical Sciences (NAMS) Dr Shiv Kumar Sarin, Co Chairman Dr Ashok Gupta, Conference Chairman Dr Satish Khadikar, President - Elect NAMS Dr Digambar Behra, Medical Director of Bombay Hospital Trust Dr Rajkumar Patil, Head of Cardiology Dr Anil Sharma, Doctors, Specialists and delegates were present.

000

                            

आरोग्याविषयी



Featured post

Lakshvedhi