Friday, 28 July 2023

वय कमी पण केस खूप पिकलेत? ४ घरगुती उपाय, ना डाय- ना हेअर कलर, केस होतील काळेभोर.....*

 *वय कमी पण केस खूप पिकलेत? ४ घरगुती उपाय, ना डाय- ना हेअर कलर, केस होतील काळेभोर.....*


आजकाल प्रत्येक घरातील १ ते २ व्यक्ती केस पांढरे होण्याच्या समस्येतून जात असतो. केस पांढरे होण्यानं आरोग्यावर फारसा फरक पडत नसला तरी मानसिक आरोग्यावर या बदलांचा परिणाम होत असतो. (How To Convert Grey Hair To Black Naturally) केस पांढरे झाल्यानं आपण वयाआधीच म्हातारे दिसतोय का, आपण जास्त वयस्कर वाटू का, लोक काय म्हणतील असे वेगवेगळे विचार येतात आणि माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. केस काळे करण्यासाठी हेअर डाय हा पर्याय असला तरी हेअर डाय वापरायला अनेकांना अजिबात आवडत नाही. काही सोपे घरगुती करून तुम्ही पांढरे केस काळे करू शकता. यामुळे तुमचे केस केमिकल्सच्या संपर्कात न येता नैसर्गिकरित्या काळे होतील. (How get black hairs naturally)


*कोरा चहा...*

चहाचा परिणाम केसांचा रंग बदलण्यावरही दिसून येतो. पांढऱ्या केसांच्या समस्येवर काळ्या चहाचा वापर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात ब्लॅक टी बनवा. हे पाणी थंड करून केसांना लावा. केसांना लावल्यानंतर अर्धा तास सोडा. यानंतर केस धुवावेत. पांढरे केस काळे करण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करा.


*मेथी...*

मेथीचे दाणे बारीक करून पावडर तयार करा. या पावडरमध्ये 3 ते 4 आवळ्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळा आणि पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क डोक्याला लावा आणि तासभर ठेवल्यानंतर धुवा. चांगल्या प्रभावासाठी, आठवड्यातून एकदा हे केस मास्क लावा. केसांवर चांगला परिणाम दिसून येईल


*कढीपत्ता...*

केस काळे करण्यासाठी कढीपत्ता अगदी सहज वापरता येतो. कढीपत्त्याच्या वापरासाठी 2 चमचे आवळा पावडर घ्या आणि त्यात 2 चमचे ब्राह्मी पावडर घ्या. कढीपत्ता बारीक करून या मिश्रणात मिसळा. केसांना प्रत्येक गोष्ट लावण्यासाठी यामध्ये हलके पाणी मिसळले जाऊ शकते. पाण्यात मिसळल्यावर हा मास्क केसांवर लावण्यासाठी योग्य ठरतो. साधारण तासभर केसांवर ठेवल्यानंतर धुवा.


*नारळाचं तेल...*

खोबरेल तेल केसांना व्यवस्थित लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन त्यात लिंबाचा रस आणि भाजून पावडर केलेल्या कलौंजीच्या बिया मिसळा. हे मिश्रण केसांना लावण्यापूर्वी ते कोमट गरम करा आणि नंतर ते मुळापासून टोकापर्यंत लावा. 1 ते 2 तास केसांवर ठेवा आणि नंतर केस धुवा. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी लावता येते. त्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतात.


*©कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार,


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


राज्यपालांच्या उपस्थितीत अंजुमन इस्लामच्या१५० व्या वर्ष समारोहाचा शुभारंभ

 राज्यपालांच्या उपस्थितीत अंजुमन इस्लामच्या१५० व्या वर्ष समारोहाचा शुभारंभ


            मुंबई, दि. 27 : सन १८७४ मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतील अंजुमन- ई - इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेच्या १५० व्या वर्षाचा उद्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


            यावेळी अंजुमन समुहातील विविध संस्थांमध्ये अध्यापन करीत असताना पी.एचडी. प्राप्त करणाऱ्या ५७ अध्यापकांचा तसेच विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  


            अंजुमन संस्थेच्या मुंबई सेन्ट्रल येथील सैफ तय्यबजी मुलींच्या शाळेच्या सभागृहात झालेल्या सत्कार सोहळयाला 'अंजुमन'चे अध्यक्ष डॉ झहीर काझी, वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे विश्वस्त प्राचार्य, शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.


००००


 


Governor launches 150th Anniversary Celebrations of Anjuman I Islam'


 


            The yearlong celebrations of the 150th anniversary of Anjuman I Islam institution was launched in presence of Maharashtra Governor Ramesh Bais in Mumbai on Thursday (27 July).


            The Governor felicitated 57 faculty members and students of various educational institutions of Anjuman-I-Islam who obtained Ph. D. degrees at the function held at Anjuman's Saif Tyabji Girls High School, Mumbai Central. 


            President of Anjuman-I-Islam Dr. Zahir Kazi, Vice Chancellor of University of Mumbai Dr. Ravindra Kulkarni, Senior Vice President of 'Anjuman' Mushtaq Antulay, Principals, teachers and alumni of various Anjuman institutions were present.


0

देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण

साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात

पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ

मुंबई, दि. २७ :- राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख 'पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतीलअसा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यानप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचा महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार पात्र शेतकऱ्यांना लाभ होणार असून सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीकर (राजस्थान) येथे आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वितरण आणि सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुंडेसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्यासह ठाणेरायगडपालघर जिल्ह्यातील शेतकरी दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.

शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत होते. आता बियाण्यांपासून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान,  यंत्रसामग्री आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी या समृद्धी केंद्रांमध्ये उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी हे समृद्धी  केंद्र 'वन स्टॉप सेंटरसारखे काम करेल. तसेच वर्षाअखेरीस देशात अशी पावणे दोन लाख केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे. म्हणूनच शासनाने ९ वर्षात शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत. बियाण्यांपासून बाजारपेठपर्यंत नवीन व्यवस्था निर्माण केली. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २ लाख ६० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ देणारी ही जगातील एकमेव योजना आहे. सोबतच युरियाच्या किमतीसुद्धा शासनाने कमी केल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात येते. भारताताच्या तुलनेत इतर विकसनशील देशात युरियाचे दर चौपट आहेत तर विकसित देशात ते १० ते १२ पट आहेत. शेतकऱ्यांसाठी सल्फर कोटेट युरिया गोल्ड तयार केले आहे. पिकांसाठी आवश्यक असणारे सल्फर युरियासोबतच पिकांना मिळेल आणि त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होईलअसा विश्वासही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

देशातील पौष्टिक तृणधान्य आता जगातील मोठ्या बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत. 'श्री अन्नम्हणून त्याला विकसित देशातही मागणी आहे. देशात पौष्टिक तृणधान्याचे  उत्पादनत्यावर प्रक्रिया आणि त्याची निर्यात या सर्वच बाबीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा लाभ देशातील लहान शेतकऱ्यांना होतोयअसेही प्रधानमंत्री मोदी म्हणाले.

राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना लाभ१ हजार ८६६ कोटी रुपये होणार जमा

-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले असून राज्यातील ८५.६६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहेत्या लाभापोटी सुमारे १ हजार ८६६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेतअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणारी ऐतिहासिक योजना असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचे ६ हजार व राज्य सरकारच्या  नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ६ हजार असे वर्षाला एकूण १२ हजार शेतकऱ्याला मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात लाभ  होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी कृषी विभाग काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

0000



 

सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्रासाठीशासन सकारत्मक निर्णय घेईल

 सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्रासाठीशासन सकारत्मक निर्णय घेईल


- कृषीमंत्री धनंजय मुंडे


            मुंबई, दि. 27 : राज्यात सद्य:स्थितीत जळगाव व नांदेड येथे केळी संशोधन केंद्र अस्तित्वात आहे. केळी विकास महामंडळाच्या येणाऱ्या धोरणात सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी संशोधन करण्यासाठी कृषी विभाग सकारात्मक निर्णय घेईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


                मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेलगाव येथील कोरडवाहू संशोधन केंद्राची जागा केळी संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या जागेवर १९४१ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कोरडवाहू संशोधन केंद्राची स्थापना झाली आहे. त्यामुळे ती जागा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथे कुठे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी केळी संशोधन करता येईल का, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय शिंदे, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.


****

भविष्यनिर्वाह निधीचे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध

 भविष्यनिर्वाह निधीचे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध


मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्यातील वर्ग चारच्या कर्मचा-यांव्यतिरिक्त ज्यांचे भविष्यनिर्वाह निधी लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.), महाराष्ट्र कार्यालयामधे ठेवले जातात, त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी लेख्यांचे वर्ष २०२२-२३ चे वार्षिक विवरण महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे. पोर्टलवरील https://sevaarth.mahakosh.gov.in ह्या लिंक वर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत कर्मचारी त्यांचे वार्षिक विवरण पाहू शकतात, व प्रिंट करु शकतात.


लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.) नागपूर कार्यालयामधे भविष्यनिर्वाह निधी लेखे ठेवलेल्या कर्मचा-यांनी सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी काही मुद्द्यांचे अनुपालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांचे समायोजन करणे शक्य होईल.


            महाराष्ट्र शासनाच्या १७ मे २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाइल क्रमांक महालेखाकार, नागपूर या कार्यालयात नोंदणीकृत करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्व कर्मचारी यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यामधे जमा अभिदान तसेच त्यांना दिलेल्या अग्रीम राशी व भविष्यनिर्वाह निधी अंतिम आहरणच्या आवेदनाची प्राप्ती तसेच त्याच्या प्राधिकृत होण्यासंबंधीचा संदेश पाठवता येऊ शकेल. अद्याप मोबाईल क्रमांक नोंदणीकृत न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक fm.mh2.ae@cag.gov.in ह्या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे अधिकारी यांना पूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व सेवार्थ आयडीसह पाठवावा असे आवाहन प्रधान महालेखाकार, नागपूर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून करण्यात आले आहे.


सर्व कर्मचाऱ्यांनी नाव व जन्म तारीख भविष्यनिर्वाह निधी विवरण पत्र तसेच सेवार्थ प्रणालीत तपासून घ्यावे. तफावत असल्यास नाव व जन्म तारीख सेवार्थ प्रणालीमधे सुधारित करून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचेमार्फत अचूक नाव व जन्मतारीख कर्मचाऱ्याच्या सेवार्थ आयडीसहgpftakrarngp@gmail.com वर ईमेल करावा किंवा फॅक्स क्रमांक 0712- 2560484 वर सूचित करावे.


भविष्य निर्वाह निधी अनुसूचीमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांक, विभागाशी संबंधित सिरीज, पूर्ण नाव बरोबर असल्याची खात्री करावी. मासिक अभिदानाची राशी किंवा घेतलेले अग्रीमची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांच्या माध्यमातून कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांक, अनुसूची, प्रमाणकाची राशी अनुसूचीच्या प्रती बरोबर पाठवावी.  

सन २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अनुदानाबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार

 सन २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्याअनुदानाबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 27 : नक्षलग्रस्त भागातील उर्वरित महिला महाविद्यालय तसेच अल्पसंख्यांक, भूकंपग्रस्त, आदिवासी, डोंगराळ, सीमावर्ती भागातील महाविद्यालयांना सन २००१ पूर्वी कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आलेल्या कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, विद्या शाखा यांना अनुदान मंजूर करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य राजेश टोपे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सन 2001 पूर्वीच्या 78 महाविद्यालयाबाबत सविस्तर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला होता. त्यात काही त्रुटी आहेत असे वित्त विभागाने कळविले आहे. या त्रुटींची विभागाकडून तातडीने पूर्तता करून वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून या महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.


            नक्षलग्रस्त भागातील पात्र 14 महिला महाविद्यालयांना विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अकृषी विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयातील ज्या तालुक्यात एकही अनुदानित महाविद्यालय अथवा विद्या शाखा नाही, अशा प्रत्येक तालुक्यामध्ये एका महाविद्यालयास किंवा विद्याशाखेस 100 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


००००


काशीबाई थोरात/विसंअ/

जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे.*

 *जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे.*


जिऱ्यामध्ये अँटी 🛡️ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील🧍🏻‍♂️ विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. जाणून घेऊया जिरं खाण्याचे फायदे.


*त्वचेसाठी*

जिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी 💧 रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॕक्नेची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं 🫳🏻 कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन पासूनही रक्षण होतं. त्याशिवाय जिऱ्याचा उपयोग हा सोरायसिस 🦠 आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठीही केला जातो. तुम्ही हवं असल्यास जिरा पावडरच्या वापर फेसपॅकमध्येही घालूनही करू शकता.


*केसांसाठी* 

त्वचेला सुंदर 👌🏻 करण्यासाठी जसे जिऱ्याचे फायदे आहेत. तसंच केसांसाठीही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याचं तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होतं. रोज काळ्या जिऱ्याचं सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत 💪 होतात. याशिवाय ज्यांना कोड्यांची समस्या असेल त्यांच्यासाठीही काळं जिरं फायदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी तेलासोबत जिरं गरम करून घ्या. या कोमट ♨️ तेलाने केसांना मसाज करा. 2 ते 3 वेळा हे तेल लावल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.


*ताप*

तापामुळे जेव्हा शरीर दूखू 😣 लागतं. तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ 🍮 मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता. जिऱ्यातील थंडावा ❄️ अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि ताप उतरतो.


*सर्दी*

थंडीच्या दिवसात नाक 👃🏻बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून 🔥 घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका 🤧 येणं बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठ दूर करण्यात ही मदत करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेलं जिरं घालून प्या. असं केल्याने लवकर बरं वाटेल.


*पोटदुखी*

पोटात कधीही दुखू 😖 शकतं. जेव्हा पोटात असह्य दुखत असेल तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पाहा. पोटात जेव्हा दुखेल तेव्हा जिरं आणि साखर समान प्रमाणात 🥄मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.       



*सांधेदुखी*

मेथी, ओवा, जिर आणि बडीशोप सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण एक चमचा 🥄 रोज खाल्ल्याने डायबिटीज, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसंच गॅसची 💨 समस्येवरही याचा फायदा होतो.


*कॉलेस्ट्रॉल*

आजकाल कॉलेस्ट्रॉल वाढल्याचा 📈 त्रास बऱ्याच जणांना होतो. बरेच जणांच्या खाण्यापिण्यावर यामुळे मर्यादा येतात. जिऱ्याचं सेवन 🤌🏻 केल्यास तुमच्या कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.


( *संकलन:* आर्या देव) 

🤗 *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.*)


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Featured post

Lakshvedhi