Friday, 28 October 2022

हे काय, मला n देता जेवता


 

संदेश


 

मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबतच्या

 मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबतच्या प्रशिक्षणातील माहितीचीकाटेकोरपणे अंमलबजावणी करावी

- केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल.

            मुंबई, दि. 28 : येत्या 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या माहितीचा व प्रात्यक्षिकांचा उपयोग काटेकोरपणे व शिस्तबद्धरीत्या करावा", असे निर्देश या पोटनिवडणुकीसाठी नियुक्त केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल (भा.‌प्र.से.) यांनी दिले आहेत.


             अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.देवल बोलत होते. कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण कटाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दोन सत्रात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे दीड हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.


            यंदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांनी सांगितले की, द्विस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम हा दोन‌ ठिकाणी घेण्यात आला. प्रशिक्षणाचा पहिला भाग हा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे घेण्यात आला. या अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणकीय सादरीकरणाच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन हे विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दीक्षित रोड महानगरपालिका शाळा संकुल येथे करण्यात आले होते. या शाळेमध्ये असणाऱ्या वर्गखोल्यांचे सूक्ष्मस्तरीय सुनियोजिन करून या ठिकाणी मतदान प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.


            या प्रशिक्षण कार्यक्रमात नाट्यगृहातील खुर्च्यांना असणाऱ्या आसन क्रमांकाचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण वापर करण्यात आला. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रानुसार आसन क्रमांक निर्धारित करण्यात आले होते. हे निर्धारित आसन क्रमांक लघु संदेशांद्वारे आधीच कळविण्यात आले होते. तसेच याबाबतची माहिती प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर देखील प्रदर्शित करण्यात आली होती.

            मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणादरम्यानची आसन व्यवस्था मतदान केंद्रनिहाय करण्यात आली होती. ज्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणादरम्यान एकाच रांगेत शेजारी - शेजारी आसनस्थ होते. यामुळे येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकमेकांशी ओळख मतदानाच्या काही दिवस आधी झाली आहे. परिणामी, मतदान केंद्रांच्या स्तरावर पूर्वतयारी करताना आवश्यक व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यास यामुळे मदत होणार आहे, असेही श्री.पाटील यांनी प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य नमूद करताना आवर्जून सांगितले.

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या दि.०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सीलबंद करणे, मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हर' यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक

 दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक

डॉ. प्रभाकर देव यांची उद्या मुलाखत

            मुंबई, दि. 28: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि. 29 ऑक्टोबर, सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

          मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीत डॉ.देव यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्ज्वल्य इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर डॉ. देव यांनी हैद्राबाद संस्थानाचा कारभार, आंदोलनकर्त्यांची कार्यपद्धती, तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 

ग्रंथपालन परीक्षेच्या फेरगुण मोजणीसाठी

 ग्रंथपालन परीक्षेच्या फेरगुण मोजणीसाठी

३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

          मुंबई, दि. २८ :-  ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असूनराज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेरगुण मोजणी करावयाची आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे पाठवावेतअसे आवाहन ग्रंथालय संचालकांनी केले आहे.

          सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात येते. या परीक्षेची गुणपत्रिका www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असूनविद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ नोव्हेंबरनंतर मिळणार आहे. तसेचज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेरगुण मोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १० रूपये या प्रमाणे शुल्क व अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत. यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीअसे ग्रंथालय संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

काव्य संमेलन

 राजभवन येथे काव्य संमेलन व स्मृती सोहळा

महावीर प्रसाद द्विवेदी यांचे जन्मगाव विकसित करण्याबाबत

 पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

 

          मुंबई, दि. 28 : महावीर प्रसाद द्विवेदी यांचे हिंदी साहित्य विश्वात मोठे नाव आहे. महावीर प्रसाद द्विवेदी त्यांचे जन्मगाव असलेल्या रायबरेली जिल्ह्यातील दौलतपूर  गावचा साहित्यिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा या दृष्टीने आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. 

          राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ.राम मनोहर त्रिपाठी सेवा समिती व श्रीमती दुर्गादेवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर प्रसाद द्विवेदी स्मृती संरक्षण अभियान रजत जयंती सन्मान व मराठी - हिंदी कवी संमेलनाचे गुरुवारी राजभवन येथे आयोजन करण्यात आलेत्यावेळी राज्यपाल बोलत होते. 

          राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ज्याप्रमाणे संत तुलसीदासमीराबाईसंत ज्ञानेश्वरतुकारामगुरुनानक यांना विसरता येणे शक्य नाहीत्याचप्रमाणे हिंदी भाषेला प्रचलित रूप देणाऱ्या महावीर प्रसाद द्विवेदी व हजारी प्रसाद द्विवेदी यांना विसरता येत नाही. प्रसिद्ध साहित्यिक व माजी मंत्री डॉ.राम मनोहर त्रिपाठी मुंबई महानगरीत आले व  महाराष्ट्राशी समरस झाले. डॉ राम मनोहर त्रिपाठी यांनी साहित्यसमाजकारण व राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आज हिंदी भाषा जागतिक भाषा झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदी समजली, बोलली जाते. महावीर प्रसाद द्विवेदी यांसारख्या साहित्यिकांचे योगदान तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमुळे हिंदी भाषा आज वैश्विक झाली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

          कार्यक्रमाला माजी मंत्री कृपाशंकर सिंहमाजी आमदार राज पुरोहितगीतकार मनोज मुंतशीरडॉ. मंजू पांडेअनुराग त्रिपाठीराजीव नौटियालसमाजसेवक प्रशांत शर्माअनिल गलगलीब्रिजमोहन पांडे यांसह साहित्यिकपत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते. 

          राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ राम मनोहर त्रिपाठी यांच्या रचना संगीतबद्ध केल्याबद्दल भजन सम्राट अनुप जलोटा तसेच  आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी स्मृति संरक्षण अभियान संस्थेचे निमन्त्रक गौरव अवस्थी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या काव्य संमेलनात रामदास फुटाणेसुनील जोशीयोगेंद्र शर्माराजीव राज व ज्योती त्रिपाठी यांनी काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमानंतर राज्यपालांच्या हस्ते सर्व कविवर्यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल त्रिवेदी यांनी केले.

००००

 

"Will write to UP CM to turn Mahavir Prasad Dwivedi village into a Memorial", says Maharashtra Governor Koshyari

 

            Mumbai 28 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today said he will write to Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath for developing Daulatpur in Rae Bareli district, the birthplace of well known poet and writer Mahavir Prasad Dwivedi as a memorial of literary tourism. Stating that the contribution of Mahavir Prasad Dwivedi and Hajari Prasad Dwivedi to Hindi literature is very high he said he will take up the matter with CM Yogi Adityanath so as to perpetuate the memory of the great writer and litterateur.

            Governor Koshyari was speaking at a programme of Mahavir Prasad Dwivedi Smriti Sanrakshan Abhiyan Silver Jubilee Awards and Kavi Sammelan at Raj Bhavan Mumbai on Thursday (27 Oct). The programme was organised by the Dr Ram Manohar Tripathi Seva Samiti and Smt Durgadevi Sharma Charitable Trust.

            Former Minister Kripa Shankar Singh, former MLA Raj Purohit, lyricist Manoj Muntashir, Dr Manju Pandey, Anurag Tripathi, Rajiv Nautiyal, social worker Prashant Sharma, Anil Galgali, writers, journalists and invitees were present. 

            The Governor felicitated Bhajan singer Anup Jalota for his work of scoring music for the compositions of Dr Ram Manohar Tripathi and also honoured the Convenor of Mahavir Prasad Dwivedi Smriti Sanrakshan Abhiyan Gaurav Awasthi.  

            Well known poets Ramdas Futane, Sunil Joshi, Yogendra Sharma, Rajiv Raj and Jyoti Tripathi presented poems on the occasion.  The Governor felicitated the poets and applauded their presentation. Anil Trivedi conducted the proceedings.

0000


 


रोशन तुम्ही से दुनिया


 

Featured post

Lakshvedhi