Tuesday, 17 March 2026

2000, 2011 ते 2025 या कालावधीत मुंबईत उभ्या आणि आडव्या स्वरूपात झालेल्या अतिक्रमणांचा

 आजच्या बैठकीत 20002011 ते 2025 या कालावधीत मुंबईत उभ्या आणि आडव्या स्वरूपात झालेल्या अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामेवाढीव मजले  निदर्शनास आले. या अतिक्रमणांचे मॅपिंग करून संबंधित विभागांनी कारवाईसाठी संयुक्त कृती आराखडा तयार करावाअसे निर्देश पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

मुंबईतील नालेनद्या आणि मोकळी जमीन अतिक्रमणमुक्त केल्याशिवाय शहराचा शाश्वत विकास शक्य नाही. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून अतिक्रमणांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले. हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.

मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा

 मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा

                                                                        - पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबईदि. 16 : मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत कारवाईचा ठोस आराखडा तयार करावाअसे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. अतिक्रमण ओळखण्यासाठी नेत्रम या आज्ञावलीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सॅटेलाईट मॅपिंगड्रोन सर्व्हे आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यावरही भर देण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक झाली. या बैठकीस आमदार मिहिर कोटेचापर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोजमुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियारगृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे मिलिंद बोरीकर यांच्यासह झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणमुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सादरीकरण

 पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सादरीकरण केले. यावेळी संस्थापक आमिर खानकिरण रावअमित चंद्रा यांनीही जलसंधारणाची कामे प्रभावी होण्यासाठी मते व्यक्त केली. फाउंडेशनने राज्यामध्ये स्वयंसेवक तत्त्वावर १३ हजार १२१ शासकीय अधिकाऱ्याचे मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. तसेच फार्मर कप निवासी प्रशिक्षणासाठी १६ हजार २६० शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये ५७.५६ टक्के महिला शेतकरी आहेत तसेच ११ हजार ९५ निमंत्रकांनी नोंदणी केली आहे

पाण्याचे महत्व ओळखून फाउंडेशन काम

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेहवामान विषयक संशोधन करणाऱ्या विविध संस्थांनी यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे मत केले आहे त्यामुळे राज्यात ८० टक्के पाऊस होईलअसे गृहीत धरून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे. पाणी फाउंडेशनच्या मागील कामाचा अनुभव बघता त्यांच्या माध्यमातून यावर्षीही शेतकरीग्रामस्थ जलसाक्षर होतील.

पाण्याचे महत्व ओळखून फाउंडेशन काम करत आहे. या कामासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी फाउंडेशनला मदत करावी. त्यासाठी पूरक यंत्रणा सज्ज ठेवावी. फाउंडेशन राज्यात करीत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचाही समावेश करावा. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठीत्यांच्या मागणीनुसार नियंत्रण आणि पडताळणी यंत्रणेची आवश्यकता आहे.  यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानामधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था उभारण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प

 पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १६ : पाणी फाउंडेशनने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. या फाउंडेशनने राज्य शासनाच्या समवेत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता

कमी करण्यात मदत केली.यापुढेही पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करूयाअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाच्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

महाराष्ट्र हे केवळ देशाचे पॉवर हाऊस नाही तर, जगाचे गुंतवणूकदारांचे आकर्षण बनले

 महाराष्ट्र हे केवळ देशाचे पॉवर हाऊस नाही तर, जगाचे गुंतवणूकदारांचे आकर्षण बनले असल्याचे गौरवोद्गार काढले. बैठकीत मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी अन्बळगण, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी , गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली.


           तसेच ब्रिटनमधील ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्तामधील उपायुक्त हरजिंदर कांग, शिष्टमंडळातील जस्टिन मेडर्स, एलिसन ग्रिफिट्स, सोनिया कुमार, जॉन कूपर, सराह एडवर्ड्स, जोशुआ रेनॉल्ड्स यांनी आपली मते मांडली. बैठकीचे संचलन मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे यांनी केले.


00000

ब्रिटनमधील लंडन आणि मुंबई ही शहरे आर्थिक विकासाची

 ब्रिटनमधील लंडन आणि मुंबई ही शहरे आर्थिक विकासाची क्षमता लक्षात घेता साम्य असणारी आहेत. मुंबईत जागतिक फायनान्शियल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात पुणे आणि बर्मिंगहॅम शहरात साम्य असून या उद्योगांना दोन्ही शहरात समान संधी आहेत. गुंतवणुकीसाठी निर्माण केलेल्या परिसंस्थेचा उपयोग करीत ब्रिटनमधील गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील भागीदारी निश्चितच उज्वल भविष्यासाठी लाभकारी ठरेलअशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi