Tuesday, 3 March 2026

चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत

 चांद्यापासून बांद्यापर्यंतगावखेड्यांपासून महानगरांपर्यंत पोहोचणाऱ्या एसटीच्या प्रत्येक चाकासोबत आता महसुलाची नवी चक्रेही फिरणार आहेत. बसस्थानकेत्यांचा परिसरबसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपुर वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असूनपुढील पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‍ सद्यस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातीचे अधिकार नवीन परवानाधारकांकडे जाणार आहेत.सध्या जाहिरातींद्वारे दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या निविदेमुळे या उत्पन्नात तब्बल दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. अशाप्रकारे “तिकीट विक्रीव्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झाले, तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.


 

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये...

 जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये...

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ३ :  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हेतर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

             एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरएसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरसहा.कामगार आयुक्त पल्लवी सहारेतसेच सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

          मंत्री सरनाईक म्हणाले एसटी महामंडळाची २५१ आगारे आणि ६१० पेक्षा अधिक लहान-मोठी बसस्थानके राज्यभर आहेत. सुमारे १२ हजार बसेसच्या ताफ्याद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. भविष्यात बससंख्या वाढल्यानंतर ही दैनंदिन प्रवासी संख्या १ कोटींपर्यंत जाईल. अशा व्यापक पोहोच असलेल्या माध्यमावर जाहिरात देणे म्हणजे उत्पादकांसाठी सुवर्णसंधीच

नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

 नवीन आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याचा संकल्प

राज्यात पूर्णपणे बांधकाम झालेल्या नवीन आरोग्य संस्थांना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व संस्था कार्यान्वित करण्याचा शासनाचा दृढ संकल्प आहे.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नागरिकांना आरोग्य विभागामार्फत यापुढेही राबविण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

 राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग विशेष तपासणी मोहीम

१ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी २५ लाख ८२ हजार ९९२ जणांची तपासणी झालीत्यापैकी १० लाख ५ हजार ७०४ जणांना निदान व उपचार सुरू करण्यात आले. मधुमेहासाठी १२ लाख ५२ हजार ४३४ तपासण्या होऊन २ लाख ८८ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मौखिकस्तन व गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासण्याही मोठ्या प्रमाणात पार पडल्या असून संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

कुष्ठरुग्ण सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार

 कुष्ठरुग्ण सहवासितांना प्रतिबंधात्मक उपचार

राज्यात १६,७६१ कुष्ठरुग्ण उपचाराधीन असून ४ लाख ४७ हजार २९६ सहवासितांची नोंदणी झाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३ लाख २५ हजार ४६० जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आणखी ४२,००१ जणांना अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहे.

क्षयरुग्णांना फूड बास्केट वितरण

 क्षयरुग्णांना फूड बास्केट वितरण

क्षयरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत राज्यात ३६,५०७ निक्षय मित्रांची नोंदणी झाली असून १ लाख ५७ हजार ९०४ रुग्ण उपचाराधीन आहेत. यापैकी १ लाख १२ हजार ८३८ रुग्णांची संमती घेऊन ३७,५८७ अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले आहे.

मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान

 मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान

गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी २९ हायरिस्क प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८४,७३२ LLIN लाँग लास्टींग इनसेक्टीसायड नेट (एलएलआयएन) मच्छरदाण्यांचे वितरण करण्यात आले. यात आश्रमशाळांसाठी १२,२१७ तर हायरिस्क क्षेत्रासाठी ७२,५१५ मच्छरदाण्यांचा समावेश आहे. आयसीएमआर - एनआयएमआरच्या सहकार्याने सहा संशोधन प्रकल्पही राबविण्यात येत आहेत.

Featured post

Lakshvedhi