Tuesday, 17 February 2026

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार

 मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त

 दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

·         वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन

 

मुंबईदि. १६ : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदानखारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागलआरोग्यशिक्षणपोलीस विभागांचे प्रतिनिधी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कटीयार म्हणाले कीसंस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुरू तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळामहाविद्यालयेसंस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्तृत्वनिबंध व घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ भरतीची निवड यादी प्रसिद्ध; लवकरच होणार समुपदेशन

 नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट-ड’ भरतीची निवड यादी प्रसिद्ध;

लवकरच होणार समुपदेशन

 

मुंबईदि. 17 : नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट-ड’ संवर्गातील २८४ पदांच्या भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आता नियुक्तीपूर्वी समुपदेशनासाठी  बोलविण्यात  येणार आहे.

 

            नोंदणी व मुद्रांक विभागात रिक्त असलेल्या २८४ पदांसाठी जुलै २०२५ मध्ये आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतरगुणवत्ता आणि सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली होती.

 

            उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीअंती निवड यादी व प्रतीक्षा यादी,निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादीअपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 

समुपदेशन प्रक्रिया

            निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. या समुपदेशनासाठीचा दिनांक आणि ठिकाण लवकरच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईलअशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे

भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल

 मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल विषयक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सी ४० सिटीज क्लायमेट लिडरशिप ग्रुप यांच्यातही हवामान बदल व शहरी उपाय योजना बळकट करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल

 मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल विषयक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सी ४० सिटीज क्लायमेट लिडरशिप ग्रुप यांच्यातही हवामान बदल व शहरी उपाय योजना बळकट करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या आघाडीवर असताना हवामान संवेदनशील

 महाराष्ट्र औद्योगिकीकरणशहरीकरण आणि विकासाच्या आघाडीवर असताना हवामान संवेदनशील विकासाची दिशा स्वीकारत असल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले. ऊर्जानागरी विकासपाणी आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून कृतीप्रधान धोरण राबवले जात आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये अक्षय ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमतेचा विस्तारशहर नियोजनात हवामान जोखमींचा समावेश आणि विभागनिहाय शाश्वत नियोजन यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

“संपूर्ण जग एक कुटुंब आहे” ही आपल्या संस्कृतीची भावना

 संपूर्ण जग एक कुटुंब आहे ही आपल्या संस्कृतीची भावना हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. एका प्रदेशावर होणारा परिणाम अखेरीस सर्वांवर होतो. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसमोर उभे असलेले हवामान आव्हान गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. वाढते शहरी तापमानअतिवृष्टीपूरस्थितीकिनारपट्टीवरील ताण आणि वायू गुणवत्तेवरील दबाव या गंभीर बाबी आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातही अनपेक्षित दुष्काळ व पूर यांचा फटका बसत असून या पार्श्वभूमीवर मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना हा उपक्रम केवळ चर्चेसाठी नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वित्तपुरवठ्याच्या मार्गांना चालना देण्यासाठी आहे. सर्वांनी या मंचातील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून व्यवहार्य उपाय सुचवावेतअसे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.

हवामान कृतीसाठी युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा

 हवामान कृतीसाठी युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा

                                                 -पंकजा मुंडे

 

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीहवामान कृतीसाठी शासनशहर संस्था आणि नागरिक यांची भागीदारी आवश्यक असून युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. समुदाय जनजागृतीहवामान साक्षरता आणि युवक उपक्रमांद्वारे शाश्वत महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध देशांतील प्रतिनिधी या मंचावर एकत्र येत असूनजागतिक सहकार्य आणि व्यवहार्य भागीदारीतूनच हवामान कृती यशस्वी होईल. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे हीच आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

Featured post

Lakshvedhi