Friday, 30 January 2026

Polling for Zilla Parishads and Panchayat Samitis Rescheduled to February 7; Counting on February 9, 2026

 

Polling for Zilla Parishads and Panchayat Samitis Rescheduled to February 7; Counting on February 9, 2026

Mumbai, Jan 29: In view of the three-day state mourning declared following the demise of Deputy Chief Minister Ajit Pawar, changes have been made to the remaining phases of the general elections to 12 Zilla Parishads and 125 Panchayat Samitis under them. Accordingly, polling, earlier scheduled for February 5, 2026, will now be held on February 7, 2026, while vote counting, earlier fixed for February 7, will now take place on February 9, 2026.

The State Election Commission had announced the election programme for these Zilla Parishads and Panchayat Samitis on January 13, 2026. As per the schedule, stages such as filing of nominations, withdrawal of candidature, allotment of symbols, and publication of the final list of contesting candidates have already been completed. The remaining stages include polling, counting of votes, and publication of the names of elected members in the Official Gazette.

The Supreme Court had granted only a two-week extension beyond January 31, 2026, for conducting these elections. However, following the accidental demise of Deputy Chief Minister Ajit Pawar on January 28, 2026, the State Government declared mourning from January 28 to January 30, 2026. Taking this period into account, revisions have been made to the remaining phases of the election programme.

Accordingly, the concerned District Collectors will publish the revised election schedule on January 31, 2026. Polling will now be held on February 7, 2026, from 7:30 a.m. to 5:30 p.m. Consequently, the campaign period will end at 10:00 p.m. on February 5, 2026.

Vote counting will commence at 10:00 a.m. on February 9, 2026, at the respective centres. The Model Code of Conduct in the concerned areas will be lifted after declaration of results. The names of the elected members will be published in the Government Gazette by February 11, 2026.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी

 जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान

9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी

 

मुंबईदि. 29 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानतर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणेनामनिर्देशनपत्र मागे घेणेचिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदानमतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहेपरंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योगव्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदारउद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे.

सामंजस्य करार पुढीलप्रमाणे...

महाराष्ट्र सरकार-काल्सबर्ग

क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी

गुंतवणूक: ५०० कोटी

रोजगार : ७५०

 

महाराष्ट्र सरकार- योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.

क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा

गुंतवणूक: ४ हजार कोटी

रोजगार : ६ हजार

ठिकाण: पालघर/एमएमआर

 

महाराष्ट्र सरकार-बीएफएन फॉर्जिंग्स

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: ५६५ कोटी

रोजगार : ८४७

ठिकाण: पालघर/एमएमआर

 

एमएमआरडीए-सुमिटोमो रियालिटी

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

 

एमएमआरडीए-के. रहेजा

गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स

रोजगार : एक लाख.

 

एमएमआरडीए-अल्टा कॅपिटल/पंचशील

गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स

रोजगार : २ लाख ५० हजार.

 

एमएमआरडीए-एसबीजी समूह

क्षेत्र: लॉजिस्टिक्स

गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स

रोजगार : ४ लाख ५० हजार.

 

एमएमआरडीए-आयआयएसएम ग्लोबल

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार : ८० हजार.

 

एमएमआरडीए-जायका

धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर

 

एमएमआरडीए-सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर

एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर

 

एमएमआरडीए-टेक्निकल युनिव्हर्सिटीमुनीचजर्मनी

शाश्वत नागरी वाहतूक प्रणाली

 

महाराष्ट्र सरकार-सुरजागड इस्पात

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: २० हजार कोटी

रोजगार: ८ हजार.

ठिकाण: गडचिरोली

 

महाराष्ट्र सरकार-लोढा डेव्हलपर्स

क्षेत्र: आयटीडेटा सेंटर्स

गुंतवणूक: १ लाख कोटी

रोजगार: १ लाख ५० हजार.

‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार

  ‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहतायंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनहवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासहतिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या रोगजार निमिर्तीवर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यानआगामी दोन दिवसात दावोसमध्ये एआय़क्वांटम कंम्प्युटींगडीजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयांसह फिनटेकलॉजिस्टिक्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच जहाज बांधणीईव्हीअपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणूकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशीचर्चेच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Thursday, 29 January 2026

दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधी मंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले.

तत्पुर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, अशी भावनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली

महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस

 महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार
  • पंधरा लाख रोजगार संधीआयटीडाटा सेंटरहरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक
  • गतवर्षीच्या टप्पा ओलांडून यंदा विक्रमी गुंतवणूकीचा विश्वास

 

दावोसदि. २० : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

राज्य शासनाच्या उद्योगगुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री श्री. फडणवीसउद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

            हरित ऊर्जाअन्न प्रक्रियापोलाद निर्मितीआयटी-आयटीईसडाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईलजहाज बांधणीडीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरीपालघरगडचिरोलीअहिल्यानगर या भागात पोहचणाऱ असल्यानेतेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना

 नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. २९ : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२०२६ करीता अद्याप नूतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीतअशा पात्र विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्वयंम योजनेच्या नूतनीकरणाचे अर्ज http://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे. 

 

विहित मुदतीत नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास प्राप्त न झाल्यासत्यांच्या जागी नविन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात गुणवत्ता यादीद्वारे निवड झालेली आहे व ज्यांना संबंधित वसतिगृहाकडून आवेदनपत्रे निर्गमित करण्यात आलेली आहेतअशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच प्रवेश घ्यावा. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेत हस्तांतरित करण्यात येणार नाहीतअसेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

Featured post

Lakshvedhi