Thursday, 29 January 2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;

 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

 

पुणेदि. २९ (जिमाका वृत्तसेवा) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेप्रताप जाधवरक्षा खडसेमुरलीधर मोहोळ,  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफआंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेशखासदार निरज चंद्रशेखरवन मंत्री गणेश नाईकसहकार मंत्री बाबासाहेब पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटीलकृषी मंत्री दत्तात्रय भरणेपर्यावरण मंत्री पंकजा मुंडेजलसंपदा मंत्री गिरीश महाजनकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढामृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेपर्यटन मंत्री शंभूराज देसाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेआदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईकेअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळआरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदारआमदारविविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीराजकीयसामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

अंत्यसंस्कारापूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिकशेतकरीयुवकमहिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी उभे राहून  श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यात 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता

 राज्यात 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता

-पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 27 : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असूनराज्यात 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

 

पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत कामे रेंगाळू नये,  काम पूर्ण होण्यास विलंब लागल्यास प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ होते. नागपूर ते गोंदियाभंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती द्यावी.  प्रकल्प कार्यादेश देतानाच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची अट करण्यात यावी.

 

प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा  जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली ऑटो मोडवरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागेची उपलब्धता असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून जागेची तरतूद महामार्गाच्या बाजूला करण्यात यावीअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारमुख्य सचिव राजेश अग्रवालअपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्तामहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाडमहाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

 

बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले.


आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता · भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता

·         भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी

सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

 

मुंबईदि. २७: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.

 

पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही  प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील  तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

महाराष्ट्राची तनु भान देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट' प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित

 महाराष्ट्राची तनु भान देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट'

प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित

 

नवी दिल्ली,२९ :प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेटहा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात तनु भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची 'केनदेऊन गौरविण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनसीसीचे महासंचालक  लेफ्टिनेंट जनरल वीरेंद्र वत्स  यांची विशेष उपस्थिती होती.

 

देशभरातील १७ संचालनालयांमधील २० लाख कॅडेट्सच्या स्पर्धेततनुने आपल्या अद्वितीय शिस्तीच्या आणि अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर हे ऐतिहासिक यश खेचून आणले. 'राष्ट्र प्रथम - कर्तव्यनिष्ठ युवाया ब्रीदवाक्याला सार्थ ठरवततिने प्रशिक्षणातील सर्व कठीण टप्पे यशस्वीपणे पार करत देशात प्रथम क्रमांक पटकावला. 

 

या प्रसंगी कॅडेट्सना संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला. प्रधानमंत्री म्हणाले कीसमोर असलेले हे तरुण केवळ गणवेशातील कॅडेट्स नसूनते 'विकसित भारत'चे निर्माते आहेत. तुमचे परिश्रमत्याग आणि अनुशासन हेच देशाला प्रगतीपथावर नेणारे मुख्य आधारस्तंभ आहेत.  'राष्ट्र प्रथम - कर्तव्यनिष्ठ युवाया संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी तनु भान आणि इतर विजेत्यांचे विशेष कौतुक केले. ही वचनबद्धता देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्रा

 प्रजासत्ताक दिन संचलनात

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

 

नवी दिल्ली२९ : देशाच्या ७७  व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये  राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने  प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून  या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असूनया गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

यंदा महाराष्ट्राने 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीकया संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृतीगणेशोत्सवाचा सामाजिक वारसा आणि त्यातून मिळणारा आर्थिक रोजगार व आत्मनिर्भरतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला होता. चित्ररथावरील भव्य गणेशमूर्तीपारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांच्या उत्साहाने कर्तव्यपथ दुमदुमून गेला होता. याच प्रभावी सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला  सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवडले आहे.

 

केवळ राज्यांच्या श्रेणीतच नव्हेतर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सेना दलातून 'भारतीय नौदलतर निमलष्करी दलातून 'दिल्ली पोलीसयांच्या संचलन पथकाला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवण्यात आले. केंद्रीय मंत्रालयांच्या गटामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने बाजी मारलीतर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि 'वंदे मातरम्नृत्य समूहाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची 'दिलखुलास' कार्यक्रमात विशेष मुलाखत

 जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची 'दिलखुलासकार्यक्रमात विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात 'राष्ट्रीय मतदार दिनानिमित्तकोल्हापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

ही मुलाखत बुधवारदि. 28 आणि गुरुवारदि. 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून, ‘News on AIR’ या मोबाईल ॲपवरुनही ऐकता येणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात मतदार नोंदणीमतदानाचा हक्क आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमनवमतदार नोंदणी मोहिम तसेच घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी माहिती दिली आहे.

 

येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारीमतदान प्रक्रियानिवडणुकीदरम्यान माध्यमांचा वापर करताना उमेदवारांनी घ्यावयाची खबरदारीप्रचार प्रसारासाठी परवानगी देण्यासाठीची व्यवस्थाआदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीमतदारांसाठी सुविधा तसेच शांततापूर्णपारदर्शक व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी या मुलाखतीतून सविस्तर प्रकाश टाकला आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करुन मतदानाचा टक्का वाढवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून केले आहे.

Featured post

Lakshvedhi