Thursday, 1 January 2026

१ जानेवारी २०२६ रोजी श्री. चौहान वृक्षारोपण करून शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन

 १ जानेवारी २०२६ रोजी श्री. चौहान वृक्षारोपण करून शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेणार आहेत. सकाळी १० ते ११ या वेळेत नववर्षाच्या निमित्ताने ते आपल्या दोन्ही मंत्रालयांतील अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करून विशेष संकल्प देणार असून आगामी वर्षातील कामकाजासाठी दिशा-निर्देश देतील. दुपारी २ वाजता ते शिर्डी जवळील लोणी बुद्रक येथे आयोजित ग्रामसभेत सहभागी होऊन ग्रामस्थमजूर व श्रमिक बांधवांशी संवाद साधणार आहेत. तसेच सायंकाळी ते शनी शिंगणापूर येथे दर्शन घेणार आहेत.

२ जानेवारी रोजी नाशिक येथे श्री. चौहान यांचा कृषी विज्ञान केंद्रयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२.१५ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सौजन्य भेटीनंतर सभागृहात औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ते मार्गदर्शन करणार असूनप्रश्नोत्तर व संवादात्मक सत्राद्वारे विद्यार्थी व संशोधकांशी थेट संवाद साधणार आहेत.

000


केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती

 केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान

यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती

 

मुंबई, दि. ३१ : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा शेतकरीग्रामीण विकासमहिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी नव्या संधी यांना समर्पित असूनविविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या शेतकरी व ग्रामीण विकासाच्या धोरणांची माहिती ते देणार आहेत.

महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ॲक्सेस-कंट्रोल्ड सहा-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य

 महामार्ग क्षमता सुधारणे हा या प्रस्तावित ॲक्सेस-कंट्रोल्ड सहा-पदरी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचा मुख्य उद्देश असूनयामुळे प्रवासाचा वेळ 17 तास आणि प्रवासाचे अंतर 201 कि.मी. ने कमी होण्याची अपेक्षा आहे. नाशिक-अक्कलकोट (सोलापूर) मार्गामुळे कोप्पर्थी आणि ओरवाकल या प्रमुख नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआयसीडीसीनोड्सवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची लॉजिस्टिक क्षमता सुधारणार आहे. नाशिक-तळेगाव दिघे हा भाग पुणे-नाशिक एक्सप्रेसवेच्या विकासाच्या दृष्टीने  देखील महत्वाचा आहे. एनआयसीडीसीने महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रस्तावित नवीन एक्सप्रेसवेचा भाग म्हणून हा प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे सुधारित सुरक्षा आणि विनाव्यत्यय वाहतुकीसाठी  द्रुत-गती मार्ग उपलब्ध होणार आहे.  यामुळे प्रवासाचा वेळवाहतूक कोंडी आणि परिचालन खर्च कमी व्हायला मदत होईल.  महत्त्वाचे म्हणजेहा प्रकल्प या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच नाशिकअहिल्यानगरधाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोलाचे योगदान देईल.हा सहा पदरी ॲक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉर 'क्लोज टोलिंग' सुविधेसह असणार आहे. सरासरी ताशी 60 कि.मी. आणि ताशी 100 कि.मी. डिझाइन स्पीडची अनुमती असेल. यामुळे प्रवासाचा एकूण वेळ अंदाजे 17 तासांपर्यंत कमी होईल (31 तासांवरून 45टक्केची घट), तसेच प्रवासी आणि मालवाहू वाहनांसाठी अधिक सुरक्षित, वेगवान आणि विनाव्यत्यय दळण वळणाची सुविधा उपलब्ध होईल.

या प्रकल्पामुळे सुमारे 251.06 लाख मनुष्य-दिवस प्रत्यक्ष रोजगार आणि 313.83 लाख मनुष्य-दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. या प्रस्तावित मार्गिकेच्या आसपासच्या परिसरात आर्थिक घडामोडी वाढल्यामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील.


0000

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण

 नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेलानाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूनेतिरुवल्लूररेणिगुंटाकडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (700 कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.

Wednesday, 31 December 2025

केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

 केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या

सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

 

नवी दिल्ली दि. 31- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड  नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे.

नाशिकअहिल्यानगरसोलापूर या महत्त्वाच्या  शहरांसह पुढे कुर्नुलला जोडणारा हा प्रकल्प पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद्  आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचा हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर इंटरचेंजजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेलानाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग -60 (आडेगाव) च्या जंक्शनवर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी (नाशिक जवळ) येथे समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्तावित मार्ग पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट दळण वळण उपलब्ध करेल. चेन्नई बंदराच्या बाजूनेतिरुवल्लूररेणिगुंटाकडप्पा आणि कुर्नूलमार्गे चेन्नई ते हसापूर (महाराष्ट्र सीमा) पर्यंत (700 कि.मी. लांब) चार पदरी मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे.

वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला  सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्यापासून सुरु होत असलेल्या २०२६ या नव्या वर्षानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. अन्नदाता शेतकरी बांधवांना नववर्षानिमित्त विशेष शुभेच्छा देतो. आगामी वर्ष सर्वांसाठी सुखशांती आणि समृद्धी घेऊन येवोही प्रार्थना. यानिमित्त विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी दृढ संकल्प करुयाअसे आवाहन राज्यपाल देवव्रत यांनी आपल्या संदेशातून केले आहे. 

0000

 

Governor Acharya Devvrat extends New Year Greetings

The Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat, has conveyed his greetings to the people on the eve of New Year 2026.

In his message, the Governor said, “On the joyous occasion of the New Year 2026, I extend my heartiest greetings and best wishes to all. I convey my special greetings to our farmers, the annadata of the nation. May the coming year usher in happiness, peace, and prosperity for everyone. Let us rededicate ourselves to moving forward with renewed resolve towards the vision of a Viksit Bharat.”

0000

कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर

 कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर

-         महसूल राज्यमंत्री योगेश कदम

नागपूरदि. ११ : राज्याच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू गटातील १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. तथापि कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य कृपाल तुमाने यांनी कमी दरात वाळू उपलब्ध होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत पाटीलप्रवीण दरेकरभाई जगतापनिरंजन डावखरेडॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

महसूल राज्यमंत्री कदम म्हणालेवाळू गटांमधील पाच ब्रास नैसर्गिक वाळू घरकुलांसाठी मोफत दिली जाते. राज्यात वाळू गटांचे लिलाव ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण केले जातील. ज्या तालुक्यात वाळूगट नसेल तेथे तहसीलदारांकडे अर्ज करून जेथे वाळू उपलब्ध असेल तेथून वाळू उपलब्ध होऊ शकेल. ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. तथापिकृत्रिम वाळूच्या वापरावर भर देण्याच्या उद्देशाने जेथे वाळूची जास्त मागणी असेल तेथे कृत्रिम वाळू प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. वाळू चोरी होऊ नये यासाठी दक्षता पथक कार्यरत असून त्यांच्यामार्फत निष्पक्ष कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Featured post

Lakshvedhi