Friday, 5 December 2025

गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त खारघर येथील कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज

 गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त खारघर येथील कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज

     -जिल्हाधिकारी किशन जावळे

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास

 

नवी मुंबईदि.4 :- हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 21 डिसेंबर 2025 रोजी खारघरनवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास जिल्ह्यातील शीखसिकलीगरबंजारालबानामोहयालसिंधी समाजातील प्रतिनिधींनी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ‘आरम्भता की अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आली.   

            नवी मुंबई,  खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे  21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या शहिदी समागम शताब्दी  या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ करुन करण्यात आली. यावेळी क्षेत्रिय आयोजन समितीनवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावासुप्रीम कौन्सिलनवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धूखारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग  बल,  महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ)उपस्थित होते. सिंग समाजाचे अध्यक्ष लड् राम नागवाणीनिमंत्रक तथा राज्यस्तरीय समिती तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे मिंलकित सिंग बलउपजिल्हाधिकारी रायगड रविंद्र राठोडही उपस्थित होते.

Thursday, 4 December 2025

राज्यात साडेदहा लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट

 राज्यात साडेदहा लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषीपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरणएजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जातेत्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे.

        सौर पॅनल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषीपंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते.

शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स

   शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषीपंप असा संपूर्ण संच देण्याच्या मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषीपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.

मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये नोंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान होणार

 मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

गिनीज बुकमध्ये नोंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान होणार

 

·         छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटीत उद्या सोहळा

 

मुंबईदि. ४ : महाराष्ट्राने 'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक केला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारअपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावेछत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकरऊर्जा विभागाच्य अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर

 पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती. कागदपत्रांतील त्रुटीपूर्ततेतील विलंब यामुळे अनुदान देण्यास उशीर होत होता. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने ही संपूर्ण अर्जप्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहेअसे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

        ऑनलाईन अर्जप्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडतात्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील. अर्जाची सद्यस्थितीही महाडीबीटी पोर्टलवर पाहता येणार आहे. पोर्टलवर अर्ज भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर जाईल. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकरी किंवा वारसदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना मिळणार आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांच्या चकरा न मारता त्रुटी ऑनलाइनच दुरुस्त करता येतील.

शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या

 शेतीत काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात. अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार १९ एप्रिल २०२३ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवत आहे. या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत दिली जाते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. 4 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असूनशेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असूनपूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi