गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त खारघर येथील कार्यक्रमासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज
-जिल्हाधिकारी किशन जावळे
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’
नवी मुंबई, दि.4 :- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 21 डिसेंबर 2025 रोजी खारघर, नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास जिल्ह्यातील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजातील प्रतिनिधींनी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ‘आरम्भता की अरदास’ रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आली.
नवी मुंबई, खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या शहिदी समागम शताब्दी या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ करुन करण्यात आली. यावेळी क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कौन्सिल, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ), उपस्थित होते. सिंग समाजाचे अध्यक्ष लड् राम नागवाणी, निमंत्रक तथा राज्यस्तरीय समिती तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे मिंलकित सिंग बल, उपजिल्हाधिकारी रायगड रविंद्र राठोडही उपस्थित होते.