Thursday, 4 December 2025

Orange Gate Tunnel Project Launched; Major Relief for Mumbai Traffic:

 

Orange Gate Tunnel Project Launched; Major Relief for Mumbai Traffic:

- CM Devendra Fadnavis

TBM operation for Orange Gate–Marine Drive Urban Tunnel Project inaugurated by Chief Minister and Deputy Chief Minister

Mumbai, Dec 3:Due to the Eastern Freeway, citizens can reach South Mumbai from the eastern suburbs in just 20–25 minutes. However, the onward journey would take an additional 30–45 minutes due to heavy traffic congestion. Similarly, commuters from the western suburbs and South Mumbai had to take a longer route to reach the Navi Mumbai Airport. To address these issues, the concept of the Orange Gate Tunnel was developed. This project will provide major relief to Mumbai’s traffic, informed Chief Minister Devendra Fadnavis.

विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. डिजिटल रीडिंग झोनमुळे

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेविद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. डिजिटल रीडिंग झोनमुळे वाचन संस्कृतीला मोठी चालना मिळेल आणि  विद्यार्थ्यांना  संशोधनासाठी उपयुक्त माहिती सहज उपलब्ध होईल.

या उपक्रमात जागतिक दर्जाच्या नामांकित अशा १० हजारपेक्षा अधिक जर्नल्सचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना कुठेहीकधीही अभ्यासाची सोयऑफलाइन डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अभ्यास सामग्रीचालू घडामोडीजनरल स्टडीज साहित्य आणि परीक्षा निहाय वर्गीकृत माहिती प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.


चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ · विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध

  

चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्याडिजिटल स्मार्ट रीडिंग झोनचा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

·         विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध

मुंबई, दि.३:- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात येऊन  विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.असे अभिनव उपक्रम महाविद्यालयांनी राबवावेत असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयातडिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’ उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते  दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आला.

यावेळी  आदिवासी विकास मंत्री  डॉ. अशोक वुईके (ऑनलाइन)उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरतंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईकग्रंथालय संचालक अशोक गाडेकरतसेच विभागातील अधिकारीप्राचार्यप्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Wednesday, 3 December 2025

दिव्यांगजन समानतेचे भागीदार: राष्ट्रपती

 दिव्यांगजन समानतेचे भागीदार: राष्ट्रपती

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  म्हणाल्यादिव्यांगजन हे समानतेचे हक्कदार आहेत. समाज आणि देशाच्या विकासप्रक्रियेत त्यांची समान भागीदारी निश्चित करणे हे सर्वांचे  कर्तव्य आहे.  दिव्यांगजनांच्या समान सहभागानेच कोणताही समाज खऱ्या अर्थाने विकसित समाज ओळखला जातो असेही त्यांनी यावेळी सांगितले 

 

            केंद्र सरकारने आता कल्याणकारी दृष्टिकोन सोडून अधिकार-आधारितसन्मान-केंद्रित व्यवस्था’ स्वीकारली आहे. 2015 पासून दिव्यांगजन’ या शब्दाचा वापर करण्याचा निर्णय त्यांच्याप्रति विशेष आदर दर्शवतो. सुगम्य भारत अभियान2016 चा दिव्यांगजन अधिकार कायदा आणि राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीतून दिव्यांगजनांना सशक्त केले जात आहे. यावेळी त्यांनी विशेषत: श्रेष्ठ दिव्यांग बालक मास्टर मोहम्मद यासिन (केरळ) आणि श्रेष्ठ दिव्यांग बालिका कुमारी धृती रांका (पुणेमहाराष्ट्र) यांच्यासह पुरस्कारप्राप्त सर्व मुलींच्या असाधारण कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी वैष्णवी थापा या दृष्टिहीन विद्यार्थिनीने  सरस्वती वंदना सादर केली

राष्ट्रीय सन्मानाने महाराष्ट्रातील कर्तृत्वाचा गौरव

 राष्ट्रीय सन्मानाने महाराष्ट्रातील कर्तृत्वाचा गौरव

नागपूरच्या अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती जितना या नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल आणि प्रेरक वक्ता म्हणून ओळखल्या जातात. तरपुण्यातील भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या श्रवण बाधित असूनही कला आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षिका म्हणून त्यांनी 500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेचकुमारी धृती रांका (पुणे) हिला श्रेष्ठ दिव्यांग बाल-बालिका श्रेणीत सन्मान मिळाला. धृती 'टिकलर आर्ट'ची संस्थापक असून न्यूरो-डायव्हर्स कलाकारांच्या आजीविकेला प्रोत्साहन देते आणि तिने शार्क टँक इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिीकरण पुरस्कार-2025’ प्रदान

 राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिीकरण पुरस्कार-2025’ प्रदान

महाराष्ट्रातील प्रतिभांचा विज्ञान भवनात सन्मान

 

नवी दिल्ली दि. 3 :  महाराष्ट्रातील  दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थां आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती यांना  राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार-2025’ प्रदान करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सचिव बी. विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार -

 नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. 03:- राज्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  प्रकाश आबिटकर यांनी दिले .

आरोग्य भवन येथे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आरोग्य सेवा सचिव डॉ. निपुण विनायक व ई. रवींद्रनआयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेआरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकरयांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

         सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य सेवा गट- ब (बीएएमएस) हे पद असूनया पदावर सेवा प्रवेश नियमानुसार दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांना सामावून घेण्याबाबत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

          सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवसंजीवनी योजनेअंतर्गत 1995 पासून राज्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi